आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: आज 193 गणेश मूर्तींचे विसर्जन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा जवळपास ४८७ सार्वजनिक गणेश मुर्तींची स्थापना झाली आहे. रविवारपासूनच (दि. ३) विसर्जनाला सुरूवात झाली असून,सर्वाधिक १९३ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन मंगळवारी (दि. ५) करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. 
 
आयुक्तालयात सप्टेबरला ११, सप्टेंबरला २३, पाच सप्टेंबरला १९३, सहा सप्टेंबरला १६४, सात सप्टेंबरला ८३, आठ सप्टेंबरला १२ आणि दहा सप्टेंबरला एका गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. अनंत चतुदर्शीला गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाते.यावर्षी मंगळवारी अनंत चतुदर्शी असल्याने सार्वजनिक गणेश घरगुती मुर्तींचेही विसर्जन होणार आहे. शहरात छत्री तलाव, वडाळी तलाव प्रथमेश तलावावर विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे. 
 
सकाळी ११.२४ चा मुहूर्त 
अनंत चतुर्दशीनिमित्त मंगळवारी (दि. ५) शहरात घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन होणार आहे. सकाळी ११ वाजून २४ मिनीटांपर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे. त्यानंतर पौर्णिमेला प्रारंभ होणार असल्याची माहिती पवन महाराज घोंगडे यांनी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...