आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: गणेश विसर्जन शांततेत, गुलालाची उधळण करीत गणेशाला उत्साहात निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात वरुड येथील दहा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन उत्साह शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 
शहरातील जाता मस्जिद चौक, आंबेडकर चौक, कुबडे चौक यासह शहरातील मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशे, लाऊडस्पिकरसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून ठाणेदार गोरख दिवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंगाडे, कैलास घट्टे, एस. पी. पाटील, पोलिस उपनिरीक्षक दिलीप श्रीराव, राहुल बोरकर, प्रिया उमाळे यांच्यासह मोर्शी, बेनोडा, शेंदुरजना घाटचे ठाणेदार, अमरावती येथील पोलिस दलाचे पथक, होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी आदींसह शेकडो कर्मचारी बंदाेबस्तामध्ये सहभागी झाले होते.
 
या प्रसंगी नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष किशोर भरत,तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, मनोज गुल्हाने, मुख्याधिकारी प्रकाश राठोड, अब्दुल खालिक, मो. रफीक, मो. मुकीम, अशोक देवते, हरिष कानुगो, राजु सुपले, सुलेमान शाह, मो. अश्पाक, अन्सार खान यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत दुसऱ्या दिवशी काही गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे नागरिकांचे सहकार्य लाभले. भावपूर्ण वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला. 
 
ढोल-ताशांच्यागजरात भाविकांनी दिला बाप्पांना निरोप 
चांदूर बाजार - तालुक्यातील देऊरवाडा येथे गणेशोत्सव शांततेत पार पडला. गावातील एकूण चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींना अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. या प्रसंगी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्यासारखा होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरजगाव कसबा पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. गणपती मिरवणुकी दरम्यान देऊरवाडा येथील शिवाजी गणेश मंडळाने पारंपरिक आदिवासी नृत्य करणाऱ्या आदिवासींनी देऊरवाडावासियांचे लक्ष वेधले होते. या वेळी भाविकांनी तसेच आदिवासी जमातीतील नागरिकांनी आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. या वेळी शिरजगावचे ठाणेदार मुकुंद कवाडे, उपपोलिस निरीक्षक सुबोध वंजारी तसेच शिरजगाव कसबा येथील अधिकारी आणि कर्मचारी, गावचे पोलीस पाटील अतुल भोंगाडे, किरण सीनकार, विकास सोनार, दीपक भोगाडे, मधू भलावी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. 
 
कुऱ्हा येथे गणरायाला निरोप 
येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीला ढोल, ताशे गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील वीर अभिमन्यू गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ लहान बालाजी गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत निघाल्या. या प्रसंगी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विषेश म्हणजे मिरवणुकीदरम्यान सामाजिक एकोपा दिसून आल्याने मंडळांचे पदाधिकारी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रमेश दमाये, विजय गाढवे, संतोष धुमाळे यांचा ठाणेदार सुनील किनगे, सरपंच विजयसिंग नहाटे, सै. निशाद, उपसरपंच सै. जहागिरदार, अ. सत्तार, शहेजाद पटेल, साबिर हुसेन आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शांतता समितीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. 
 
अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत शांततेत भावपूर्ण वातावरणात लंबोदराला निरोप देण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...