आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षाच्‍या मुलीवर बलात्कार करून खून केल्‍याप्रकरणी आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आज ( शुक्रवारी )एका खटल्याचा महत्वपूर्ण निकाल सुनावला आहे. दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला न्‍यायालयाने दुहेरी जन्मठेप आणि दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे सन 2013 साली ही धक्‍कादायक घटना घडली होती. या प्रकरणात चुलत मामानेच अवघ्‍या दोन वर्षाच्‍या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा खुन केला होता. संपूर्ण यवतमाळ शहर या घटनेने हादरुन गेले होते. या प्रकरणी न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात आला. त्यानंतर आज दोन वर्षात खटल्याचा निकाल लागला आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, आरोपीची फोटो..