आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात महिलेवर सात जणांचा सामूहिक अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रिद्धपूर ते जालनापूर शेतशिवारात बुधवारी रात्री सात जणांनी एका २५ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. घाबरलेल्या अवस्थेतील पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. तर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. संदीप देवेंद्र ठाकरे (३०), प्रफुल्ल दामोदर वाघाडे (२३), संतोष लखन सोफकर (१८), शुभम नरेंद्र वानखडे आणि शिवा मनोहर जामठे (१९, सर्व राहणार रिद्धपूर) आरोपींची नावे आहेत.

पीडित महिला मुलीसह चांदूर बाजार येथे किरायाने राहात हाेती. काही दिवसांपूर्वी ती परिचारिकेचे काम करत होती. रिद्धपूर येथे राहणाऱ्या एका युवकासोबत तिची ओळख झाली होती. तिने गरज असल्यामुळे त्याच्याकडे उसने पैसे मागितले. सदर तरुणाने होकार देत पैसे नेण्यासाठी तिला रिद्धपूरला बोलावले. तसेच माझ्या मित्रासोबत दुचाकीने ये, असेही सांगितले. दुसरा तरुणही ओळखीचा असल्याने ही महिला संतोषसोबत गेली. रात्रीच्यावेळी रिद्धपूरपासून काही अंतरावर असलेल्या जालनापूर शिवारात संतोषने एका शेतात गाडी थांबवली. त्या ठिकाणी संदीप, प्रफुल्ल, शुभम, शिवा व अन्य एक युवक असे पाच जण आधीपासून अालेले हाेते. त्यांनी या विवाहितेवर रात्री ९ ते ११ दरम्यान सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील पीडित महिला कशीबशी घटनास्थळावरून पळाली व तिने रात्री साडेबाराच्या सुमारास थेट पोलिस ठाणे गाठले. आणि आपबिती कथन केली. ऐकून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला रुग्णालयात नेले. व तिच्या तक्रारीवरून सातही जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, नियोजित कट रचणे आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल केले.

पुढील स्‍लाइडवर वाचा चार तासांत आरोपी अटक