आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीचा दुरावा असह्य; युवतीने केली आत्महत्या, रामपुरी कॅम्पमधील धक्कादायक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लहानपणापासून जीवलग असलेल्या मैत्रिणीने सांगता लग्न केले. जीपावाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणीने दाखवलेला हा दुरावा असह्य झाल्याने एका १९ वर्षीय युवतीने बुधवारी (दि. ७) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील रामपुरी कॅम्पमध्ये घडली.

हेमा हरिषकुमार बिहानी (१९, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) असे मृतक युवतीचे नाव आहे. शहरातच राहणारी एक युवती हेमाची लहानपणापासून जीवलग मैत्रीण होती. दरम्यान काही दिवसांपुर्वी हेमाच्या मैत्रिणीने विवाह केला. विवाह केल्यानंतर विवाहाचे छायाचित्र हेमाला पाहायला मिळाले. जीवलग मैत्रिणीने लग्न केले, आपल्याला सांगितले नाही, लग्नाला बोलवले नाही. या गोष्टीमुळे हेमा अस्वस्थ झाली. त्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे हेमाने मृत्यु पुर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. दरम्यान बुधवारी दुपारी हेमाच्या घरी कोणीही नसताना तिने बेडरुममध्ये पंख्याला गळफास लावला.ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हेमाला खाली उतरवण्यात आले तसेच डॉक्टरांना बोलविण्यात आले होते.

मात्र डॉक्टरांनी तपासणी करून हेमाला मृत घोषित केले . या प्रकरणाची माहिती हेमाचे नातेवाईक घनश्याम उधमदास बिहानी यांनी गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आत्महत्यापूर्व लिहिली चिठ्ठी
हेमाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. जीवलग मैत्रिणीने सांगता विवाह केला त्यामुळेच आपण हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. कैलाश पुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.
बातम्या आणखी आहेत...