आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: पदवीधर विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- पदवीप्राप्त २३ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगरात उघडकीस आली. रेखा महादेव गुल्ले वय २३, असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. 

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगर येथे २३ वर्षीय विद्यार्थिनी रेखा गुल्ले ही आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. वडील महादेव गुल्ले हे सेंट्रींगचे काम करत असून आई एमआयडीसीतील जीनमध्ये काम करत होती. रेखाने कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याने कुटुंबीयांनी तिला एमपीएससीचे क्लासेस लावून दिले होते. ती दररोज सकाळच्या सुमारास क्लासला जात होती.
 
गुरुवार, 2 मार्च रोजी सकाळी रेखा एमपीएससीच्या क्लासवरून घरी आली. त्यानंतर तिने घरातील सर्व कामे करून घेतली. वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तर आई घरातील हॉलमध्ये झोपून होती. दरम्यान दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास रेखाने घरातील स्वयंपाक घरातील सिलिंगला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर रेखाला भेटण्यासाठी तिच्या मैत्रिनी घरी आल्या असता, रेखा स्वयंपाक घरात गळफास घेऊन मृतावस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. याबाबतची माहिती कुटुंबीयांनी यवतमाळ शहर पोलिसांना दिली. 

या वेळी पोलिस उपनिरीक्षक राहुल किटे, कर्मचारी अजय वाभीटकर यांनी विश्वकर्मा नगर गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. याबाबतचा पुढील तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...