आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला थापड मारणारा तो युवक निघाला अखेर ‘पोलिस’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ट्युशनला पायदळ जाणाऱ्या एका विद्यार्थिनीची भररस्त्यात शाब्दिक छेड काढून तिला थापड मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी (दि. १) सकाळी घडला होता. थापड मारणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो ग्रामीण पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची बाब तपासादरम्यान पुढे आली आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी यासंबंधीचाअहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठवला. पोलिस आयुक्तांकडून शुक्रवारी (दि. २) हा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पोहचला आहे.
शहरातच राहणारी एक विद्यार्थिनी हर्षराज कॉलनी भागात ट्युशन क्लासला जाते. दरम्यान गुरूवारी सकाळी ही विद्यार्थिनी ट्युशनला गेली होती. ट्युशन क्लासच्याच बाहेर पायदळ जात होती. त्यावेळी एका दुचाकीवर दोन युवक आलेत. या दुचाकीवर मागे बसलेला युवक हा शैलेश दीपक वानखडे असून त्यानेच थापड मारल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला होता. दरम्यान पोलिसांच्या तपासात शैलेशनेच थापड मारल्याचे पुढे आले असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. शैलेश वानखडे हा ग्रामीण पोलिस दलात असून तो जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलिस ठाण्याला कार्यरत आहे. गुरूवारी घडलेल्या प्रकारानंतर त्या विद्यार्थिनीने गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी शैलेश वानखडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र तपासा दरम्यान शैलेश हा पोलिस शिपाई असल्याचे पुढे येताच गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.

शैलेश हा दुचाकीवर मागे बसला होता, दुचाकी चालविणारा कोण आहे, हे अद्याप कळू शकले नाही.गाडगेनगर पोलिस शैलेशला शोधण्यासाठी गेले असता तो पसार असल्याचे समजले.पोलिसानेच हे कृत्य केल्याने आता महिलांनी कोणाकडून सुरक्षेची अपेक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थापड मारणारा शैलेश वानखडेच
^विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही शैलेश वानखडेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवर शैलेशच मागे बसला होता त्यानेच थापड मारल्याचे तपासात पुढे आले आहे.या प्रकरणाचा अहवाल आयुक्तांकडे पाठवला. पुढे तो अधीक्षकाकंडे पाठवण्यात आला आहे. कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.

पडताळणीअंती कठोर कारवाई
^शहर पोलिसांकडून शुक्रवारी (दि. १) शैलेश वानखडेविरुद्ध गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाचा अहवाल मिळाला आहे.या अहवालाची परिपूर्ण पडताळणी करून कारवाई निश्चित करणार आहे. लखमी गौतम, पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...