आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: नागपुरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या, बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- येथील फुटाळा तलावात उडी मारुन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांचे बोलणे जवळपास बंद होते. भांडण मिटवण्यासाठी तरुणाने प्रेयसीला फुटाळा तलावाजवळ बोलवले होते. या दरम्यान दोघांनी तलावात उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी तरुणाने मित्राला एसएमएस पाठवून मी मरतोय असे सांगितले. मित्र पोहोचण्याआधीच दोघांनी आत्महत्या केली होती.
गप्पा मारत बसले होते, अचानक मारली उडी
- नितीन शंकर मौदेकर (रा. चंद्रभागा नगर, वय 22) आणि ऐश्वर्या तलेवाडे (रा. नाईक तलाव राऊत चौक) असे प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
- दुपारी बाराच्या सुमारास दोघे फुटाळा तलावाजवळ आले होते. बराच वेळ दोघे बोलत बसले होते. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास एकमेकांचा हात धरुन दोघांनी तलावात उडी मारली.
- तलावाजवळ असलेल्या लोकांनी मदत करण्यापूर्वीच दोघांचा बुडून मृत्यू झाला. तलावात उडी मारण्यापूर्वी नितीनने मित्र अभिषेकला एसएमएस पाठवून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.
- अभिषेक लगेच फुटाळा तलावाजवळ आला. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. त्याने नितीन आणि ऐश्वर्या यांचे मृतदेह ओळखले.
प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय
- नितीन कायम ऐश्वर्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. गेल्या काही दिवसांपूर्वी असेच झाले होते.
- नितीनने ऐश्वर्याच्या चारित्र्यावर संशय घेतला. होता. तेव्हापासून दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते.
- भांडण सोडविण्यासाठी आणि अखेरच्या भेटण्यासाठी ऐश्वर्या फुटाळा तलाव परिसरात आली होती.
- त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
ऐश्वर्याच्या घरीही गेला होता नितीन
- गेल्या शुक्रवारी नितीन ऐश्वर्याच्या घरी गेला होता. तो ऐश्वर्याच्या कुटुंबीयांना भेटला. यावेळी तिच्या आईने त्याला समजावून सांगितले होते.
- ऐश्वर्याला शिकून मोठे व्हायचे होते. चांगली नोकरी लागली की लग्न करु असे ती सांगत होती.
- नितीनलाही तिने हेच सांगितले होते. त्यासाठी नितीनने चांगली नोकरी करावी असे तिला वाटायचे.
- परंतु, नितीनला आताच लग्न करायचे होते. लग्नावर तो ठाम होता. यावरुन दोघांमध्ये कायम खटके उडायचे.
पुढील स्लाईडवर बघा, नितीन आणि ऐश्वर्याचे फोटो.... घटनास्थळी असे होते दृष्य....
बातम्या आणखी आहेत...