आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gondia Congress Mla Gopal Agarwal Beaten Up By Bjp Leader Shiv Sharma

गोंदिया: काँग्रेस आमदार अग्रवाल यांना भाजप नगरसेवक शर्माकडून मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गोंदिया नगरपालिकेतील वादातून गोंदियातील काँग्रेसचे आमदार लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल यांना भाजपचे नगरसेवक शिव शर्मा त्यांच्या साथीदाराने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी गोंदियात घडली. अग्रवाल यांनी येथील हॉटेल ग्रँड सीता येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी शिव शर्मा हे त्यांचा साथीदार श्रीवाससोबत तिथे आले. त्यांनी थेट आमदार अग्रवाल यांच्या नाकावर, तोंडावर, डोळ्यावर तसेच गालावर ठोसे लगावले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. अग्रवाल यांचा मुलगा विशाल त्यांना वाचवण्यासाठी आला असता त्यालाही शर्मा त्यांच्या साथीदाराने मारहाण केली. दोघांचे कपडेही फाडण्यात आले. मारहाण करून दोघेही तेथून निघून गेले. दरम्यान, शिव शर्मा यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.