आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळात अडकलेल्‍या ट्रॅक्‍टरला रेल्‍वेने दिली धडक, 2 तुकड्यांपैकी एक उडाला 200 फुट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया - गोंदिया जिल्‍ह्यातील काठी बघोली गावाजवळ एक ट्रॅक्‍टर असा रेल्‍वेगाडीमध्‍ये अडकला. हा ट्रॅक्‍टर रेल्‍वे क्रॉसिंगवर अडकला होता. बालाघाट गोंदिया डेमू गाडीने या ट्रॅक्‍टरला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
काय आहे प्रकरण..
- काठी बघोली गावातील शेतकरी शेतीची कामे आटोपून घरी परतत होते.
- ट्रॅक्‍टर रेल्‍वे रुळ ओलांडत होता. दरम्‍यान ही घटना घडली.
- ट्रॅक्‍टरला लावलेल्‍या नांगरामुळे ट्रॅक्‍टर रेल्‍वे रुळात अडकला.
- तेवढ्यात बालाघाटच्या दिशेने गोंदियाकडे डेमू गाडी येत होती.
- रेल्‍वे पाहून ट्रॅक्‍टर चालक बाजूला झाला व रेल्वेने ट्रॅक्टरला धडक दिली.
ट्रॅक्‍टरचे दोन तुकडे, एक तुकडा उडाला 200 फुट
- हा अपघात प्रचंड भीषण होता, अशी माहिती आहे.
- ट्रॅक्टरचे अर्धे इंजिन घटनास्थळाहून 200 फुट दूर फेकल्या गेले.
- दुसरा अर्धा भाग हा रेल्‍वेच्‍या इंजिनमध्‍येच अडकून राहिला.
- रेल्वे प्रशासनाने शेवटी गॅस कटरच्या सहायाने ट्रॅक्टरचे इंजिन कापून वेगळे केले.
- या घटनेमुळे रेल्‍वेला तीन तास थांबावे लागले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या भीषण अपघाताचे फोटो..