आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी वेळेत किशोरने जिंकली विद्यापीठ क्राॅसकंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्रीमती केसरबाई लाहोटी महाविद्यालयाचा लांब पल्ल्याच्या शर्यतीमधील तज्ज्ञ अॅथलिट्स किशोर पवारने विद्यापीठ क्राॅसकंट्री शर्यतीत इतिहास रचताना नव्या विक्रमाची नोंद केली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित या क्राॅसकंट्री स्पर्धेत किशोरने १२.५ िकमी. अंतर ३७ मिनिटांत पूर्ण केले. अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात ही सर्वात वेगवान विक्रमी वेळ असून त्याने गतवर्षी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्राॅस कंट्रीतील विजेत्या खेळाडूने नोंदवलेल्या वेळे पेक्षाही जलद वेळ काढली आहे.

के. एल. महाविद्यालयात तो सध्या बी. ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याच्या यशामुळे यंदा अमरावती विद्यापीठाला अखिल भारतीय स्तरावरही पदक मिळण्याची आशा बळावली आहे.
जाधवने गत वर्षीही अप्रतिम कामगिरी करताना उत्कृष्ट कामगिरी केली. सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांच्या योग्य तांत्रिक मार्गदर्शनाच्या आधारे किशोरने हे यश संपादन केले. किशोरने नियंत्रित वेग ठेवत अंतिम रेषा पार केली. काहीसे ढगाळ थंड वातावरणही त्याच्यासाठी सहायक ठरले. येत्या काही दिवसांत तो देशांतर्गत स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकेल असे मत के. एल. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाने व्यक्त केले. किशोरचे कुलगुरू डाॅ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डाॅ. अजय देशमुख, शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डाॅ. अविनाश असनारे, केएलचे प्राचार्य डाॅ. विजयकुमार भांगडिया, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. सतीश मोदानी, प्रा. गजेंद्र रघुवंशी, जिल्हा अॅथलिट्स संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील तसेच प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

शरीरयष्टी केनियन धावपटूंसारखी
आंतरराष्ट्रीय स्तरावर लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत केनिया इथिओपियाच्या धावकांचे वर्चस्व आहे. यासाठी काटक शरीरयष्टीचे त्यांना सहकार्य मिळत असते. किशोर जाधव चीही शरीरयष्टी अगदी केनिया आफ्रिकन धावकांसारखी दिसते. सडपातळ मजबूत अंगकाठीचा िमलाप त्याच्यात आढळतो.
बातम्या आणखी आहेत...