आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुर्तिजापूरजवळ कुरुम येथे मालगाडी रुळावरून घसरली, मुंबई- नागपूर वाहतूक विस्कळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया: गणेश देशमुख - Divya Marathi
छाया: गणेश देशमुख
मुर्तिजापूर- अकोल्यावरून नागपूरकडे जाणाऱ्या खडी वाहक गाडीच्या ट्रॉली अकोला जिल्ह्यातील कुरूम रेल्वे स्टेशन जवळ अकोल्यावरून निघालेल्या अहमदाबाद एक्सप्रेसला ट्रॅक मोकळा करून देत असतांना रुळावरून घसरल्यामुळे नागपूर व मुंबई कडे जाणाऱ्या गाड्या मूर्तिजापूर व बडनेरा व अकोला येथेच थांबविण्यात येत असून गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. अहमदाबाद एक्सप्रेस करिता लाइन क्लियर करण्याकरिता दुसर्‍या लाइनवर घेत असताना गाडीच्या ट्रॉली रुळावरुण घसरल्याने नागपूरकडे जाणार्‍या गाड्या प्रभावित झाल्याने नागपूरकडे जाणार्‍या गाड्या मूर्तीजापूर व अकोला येथे थांबविण्यात आल्याने नागपूरकडे जाणार्‍या गाड्यांची वाहतुक खोळंबली असून वाहतूक सुरळीत करण्या साठी युद्धस्त्रावर प्रयत्न करण्यात येत आहेत. भुसावळवरून नागपूरकडे  डाऊन रेल्वेलाइन वरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वेलाइन दुरुस्तीचे कार्य युद्धस्तरावर सुरू असले तरी डाउन लाइनचे पूर्ण काम झाल्यावरच अकोला व मूर्तीजापूर येथे उभ्या असलेल्या गाड्या मार्गस्थ होणार आहेत, घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचा सर्व बाजूने तपास करीत आहेत. ट्रॅक मोकळा करण्यासाठी लागणारी सर्व यंत्र सामुग्री आज रोजी तिथेच असल्यामुळे लवकरच मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासन भूमिका काय?
वारंवार होणाऱ्या अशा अपघाताची व तांत्रिक बाबी तपासून पुढील कारवाई करावी,अन्यथा वारंवार होणाऱ्या घटना मुळे मोठी जीवित हानी होऊ शकतो,यावर वरिष्ठांनी गंभीर्याने लक्ष देऊन भूमिका स्पष्ट करावी
बातम्या आणखी आहेत...