आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोसेखुर्द घोटाळ्यामध्ये सहा जणांवर अाराेपपत्र, संजय खोलापूरकर यांच्या नावाचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भातील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया बांधकामातील घोडझरी शाखा कालव्याच्या गैरव्यवहारात एसीबीने शनिवारी विशेष न्यायालयात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या तत्कालीन पाच अधिकाऱ्यांसह सहा जणांवर दोषारोपपत्र दाखल केले. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कथितरीत्या काम केलेले अधिकारी संजय खोलापूरकरांचाही समावेश आहे.
दरम्यान, शनिवारीच त्यांना नागपूर खंडपीठाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. गोसेखुर्द प्रकल्पाशी संबंधित २५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्यासुमारे ४० निविदांच्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नागपूर शाखा चौकशी करत आहे. आतापर्यंत केवळ दोन प्रकरणांतच गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी घोडाझरी कालव्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया बांधकाम घोटाळ्यात शनिवारी विशेष न्यायालयात साडेसहा हजार पानी अाराेपपत्र दाखल झाले.

सोपानसूर्यवंशी यांचाही अाराेपींमध्ये समावेश
याघोटाळ्यातील आरोपींमध्ये गोसेखुर्दचे तत्कालीन मुख्य अभियंता पूर्वअर्हता समितीचे अध्यक्ष सोपान रामराव सूर्यवंशी, समितीचे तत्कालीन सचिव कार्यकारी अभियंता रमेश डी. वर्धने, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास सहदेव मांडवकर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, विदर्भ सिंचन महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार एफ. ए. कन्स्ट्रक्शन मुंबईचे भागीदार निसार फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...