आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे; हल्लेखाेरांना 5 वर्षे जेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. शिवाय पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यास सरकार अनुकूल आहे. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हे संकेत मिळाले.

मुख्यमंत्री महासंघाच्या पदाधिकाऱ्यांत २८ सप्टेंबरला झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग तसेच महासंघाला वितरित करण्यात आले. यात तसा स्पष्ट उल्लेख आहे. राज्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी एमपीडीए कायद्यात दुरुस्ती करता येईल का, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला केली आहे. सामान्य प्रशासन विभागाला कारवाईसाठी मंडळ स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
४८तासांचा धोका! : एखादाकर्मचारी ४८ तास अटकेत राहिला तर त्याला निलंबित करण्याची तरतूद आहे. अनेकदा शुक्रवारी कर्मचाऱ्याला डांबले आणि शनिवार रविवार सलग सुट्या आल्या की त्याची नोकरी गेलीच म्हणून समजा. त्यामुळे अशा सुट्या वगळण्याच्या मागणीवर फेरविचार होऊ शकतो. लाचखोरीबाबत मात्र गय होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.

७ वा वेतन आयोगही...
राज्यात दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करणे सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतही राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...