आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंबाखूजन्य पदार्थांची केली जाते तपासणी; स्वच्छता राखणारा स्तुत्य उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासकीय रुग्णालयांपासून बहूतांश खासगी रुग्णालयांपर्यंत रुग्णांचे नातेवाईक, नागरिक रुग्णालयाच्या भिंती काेपरे पिकदानी समजून रंगवून ठेवत असल्याचे चित्र सर्वदूर पाहायला मिळते. यामुळे रुग्णांच्या आरोग्यासोबतच स्वच्छतेचाही बोजवारा उडून आरोग्यासंबधी अनेक प्रश्न निर्माण होतात. हीच बाब हेरून रुग्णांची काळजी घेण्याच्या उद्देशाने येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या गेटवरच येणाऱ्या प्रत्येकाची अंगझडती घेऊन तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा खिशातून काढून घेण्याचा उत्तम उपक्रम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.
येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये अनेक दुर्धर आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली स्वच्छता शिस्त खरोखरच इतर रुग्णालयांसाठी अनुकरणीय प्रेरणादायी अशीच आहे. दरम्यान, सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी काही महिन्यांपासून रुग्णालयामध्ये प्रवेश करणाऱ्याची अंगझडती घेऊन तंबाखूजन्य पदार्थ असतील, ते पदार्थ काढल्यानंतरच आंत प्रवेश देण्याची पद्धत सुरू केली आहे. या कामासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहे. त्यांच्याकडेच अंगझडतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुरूवातीला अनेकांनी सुरक्षारक्षकांसोबत वाद घातले,मात्र आता या पद्धतीची माहिती झाल्यामुळे ते सहकार्य करत असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले. या पद्धतीमुळे रुग्णालयातील कोपरे भिंती आता स्वच्छ आहे. पर्यायाने ही स्वच्छता रुग्णासाठी अत्यावश्यक आहे.

इतर रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येत असतात. यामध्ये काही जणांच्या खिशामध्ये तंबाखूजन्य पदार्थ असतात. काही नातेवाईक तर रुग्णांच्या शेजारी बसून तंबाखू खातात दिसून येतात.

रुग्णांसाठी स्वच्छता आवश्यक
^रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तीकडे तंबाखूजन्य पदार्थ असतील ते प्रवेशद्वारावरच काढण्यात येतात. यासाठी वेळ पडली तर संबधितांची अंगझडतीसुद्धा 0आमचे सुरक्षारक्षक घेतात. रुग्णालय रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहिल्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही. त्यामुळे रुग्णांनाही त्रास होणार नाही. हाच आमचा उद्देश आहे.’’ डॉ.श्यामसुदंर निकम, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी रुग्णालय,अमरावती.

बातम्या आणखी आहेत...