आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्बलांसाठी 13 धर्मदाय रुग्णालयांमध्ये सुविधा, माहिती धर्मादाय सहआयुक्तांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - धर्मदाय रुग्णालय योजनेनुसार निर्धन व दुर्बल घटकांसाठी तेरा रुग्णालयांत सुविधा उपलब्ध असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त यांनी कळवली आहे. या योजनेनुसार संबंधित रुग्णालयातील एकूण खाटांच्या दहा टक्के निर्धन घटकांसाठी तेवढ्याच खाटा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ५० हजारांहून कमी उत्पन्न असलेले रुग्ण निर्धन, तर ५० हजार ते एक लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असलेले रुग्ण दुर्बल घटकात मोडतात. 
 
योजनेनुसार अशा रुग्णांनी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्यरेषेखाली मोडत असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना सवलतीच्या दरात या रुग्णालयात उपचार मिळतील. या योजनेत शहरातील मातृसदन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय अनुसंधान केंद्र, मोझरी येथील विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय, अंबादेवी संस्थान डॉ. जोशी ट्रस्ट हॉस्पिटल, दयासागर हॉस्पिटल, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट, कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट, दंत महाविद्यालय रुग्णालय, तखतमल श्री वल्लभ होमी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, महाराज रुपभजन रुग्णालय, अलमिना चॅरिटेबल हॉस्पिटल, डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल या रुग्णालयांत दुर्बल घटकांना लाभ घेता येत असल्याचे कळविण्यात आले आहे.

 या संदर्भात काही अडचण आल्यास www.mahacharity.gov.in या संकेतस्थळावर किंवा १८००२२२२७० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०७२१-२६६३३०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन धर्मदाय सहआयुक्तांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...