आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Not Responsible Of Death Associated Vyapam Murlidhar Rao

‘व्यापमं’संबंधी मृत्यूंना सरकार जबाबदार नाही, भाजपचे महासचिव मुरलीधर राव यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्याची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू अाहे. सध्याच्या घडामोडींसाठी तेथील राज्य सरकारला दोषी धरणे योग्य नाही,’ असा दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
‘या घोटाळ्याच्या चौकशीचे न्यायालयाकडून मॉनिटरिंग सुरू आहे. त्यामुळे त्यात शासन पद्धतीने हस्तक्षेप करू शकत नाही. मृत्यूंचीही चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू हा योगायोग आहे की कसे, हे त्यानंतरच स्पष्ट होईल. काँग्रेस व इतर पक्ष मात्र या मुद्द्यावर पराचा कावळा करीत अाहेत,’ असा अाराेपही त्यांनी केला.
भाजपची देशातील सदस्य संख्या ११ कोटींपर्यंत जाणार आहे. या सदस्य महाअभियानानंतर सध्या महासंपर्क अभियान सुरू असून त्यानंतर देशात १५ लाख सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हाती घेतले जाणार आहे. त्यात पक्षाची माहिती, आदर्श, कार्यपद्धती, विचारसरणी आदींबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाजपच्या दृष्टीने ११ हजार मंडळ, ६०० जिल्हे आणि ३५ प्रांतांमध्ये प्रशिक्षणाचे वर्ग होणार आहेत. प्रशिक्षण घेणा-यांचा आकडा जागतिक विक्रम करणारा ठरेल, असा दावाही मुरलीधर राव यांनी केला.
मतभेद नाहीतच
आर्थिक मुद्द्यावर भाजपचे कुणाशीही मतभेद नाहीत. आर्थिक मुद्द्यांवर परिवारातील प्रत्येक संघटनेशी सहमती असणे आवश्यक नाही. अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी मते राहू शकतात. भूसंपादन विधेयकावर पक्षामध्ये चर्चा सुरूच आहे, याकडेही राव यांनी लक्ष वेधले.