आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता गोविंदाचा अमरावतीत डान्‍स, अनुभवला दहीहंडी स्‍पर्धेचा \'थर\'थराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अभिनेता गोविंदाने रविवारी अमरावतीमध्‍ये दहीहंडीच्‍या थरांचा थरथराट अनुभवला. शहरातील युवा स्‍वाभिमानच्‍या वतीने राजापेठ चौकात आयोजित दहीहंडी स्‍पर्धेला त्‍याने हजेरी लावली. दहीहंडी फोडताना सर्व गोविंदांनी सुरक्षेची खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन करत मी गोपाळांच्‍या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्‍याचे त्‍याने सांगितले. अभिनेता गोविंदाचे आगमन होताच तरूणाईने 'गोविंदा आला रे आला' म्‍हणत त्‍याचे स्‍वागत केले. चाहत्‍यांच्‍या आग्रहाखातर काही गितांवर त्‍याने थोडा डान्‍सही केला. आमदार रवि राणा व नवनीत राणा यांचीही या वेळी उपस्‍थिती होती.

सणांचा आंनद घ्‍यावा
'आपल्‍या सणांचा मनसोक्‍स आनंद घ्‍यावा. अमरावतीमधील दहीहंडीचा उत्‍साह आणि गोपाळांची गर्दी पाहून समाधान वाटते.' असेही गोविंदा म्‍हणाला. व्‍यासपीठाहून त्‍याने चाहत्‍यांना अभिवादन केले. तरूणाईला गोविंदासोबत सेल्‍फी घेण्‍याचा मोह आवरता आला नाही. विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमही यावेळी साजरे झाले. यंदाही शहरात तीन मोठ्या दहीहंडी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍याने विदर्भातील हजारो युवकांची उपस्‍थिती होती. त्‍यामुळे दिवसभर शहरातील चौकाचौकात तरूणाईचा जल्‍लोष होता. दहीहंडीमध्‍ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध मंडळांनी विशेष खबरदारी घेतली होती. दहीहंडीखालील भाग सुरक्षित करण्‍यात आला होता.

या मंडळांचे होते आयोजन
राजापेठ चौक - युवा स्‍वाभिमान
राजकमल चौक- नवयुवक विद्यार्थी संघटना
जयस्‍तंभ चौक - युवासेना
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, अभिनेता गोविंदाचे फोटो..