आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४ कोटींंच्या कर्ज प्रकरणात जमानतदाराला केली अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एकाराष्ट्रीयीकृत बँकेकडून व्यवसायासाठी तब्बल ४ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज घेतले, मात्र या कर्जाची परतफेड केली नाही. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) अकोल्यातून कर्ज प्रकरणात जमानतदार असलेल्या एकाला अटक केली आहे.

आलाेक उल्हास जोशी (४२, रा. आळशी प्लॉट, अकोला) असे पोलिसांनी अटक केलेल्या जमानतदाराचे नाव आहे. कोटी ८१ लाखांच्या कर्ज प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गजानन कुलकर्णी आहे. त्याला यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. आलोक जोशी हा गजानन कुलकर्णीचा साळूभाऊ आहे. कुलकर्णीच्या तीन सहकाऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतेवेळी चार मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. तसेच काही जामीनदार घेतले होते. त्यामध्ये एक मालमत्ता आलोक जोशीची होती तो जमानतदारसुद्धा होता. आलोक जोशीने अकोला येथे असलेले साईकृपा मंगल कार्यालय तारण ठवले होते तसेच स्वत: जमानतदार म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंजाबराव वंजारी, पीएसआय श्रीकृष्ण पारधी, ईश्वर चक्रे, किशोर पंड्या, देवारे या पथकाने मंगळवारी जोशीला अकाेल्यातून अटक करून शहरात आणले आहे.

२०११ मध्ये गजानन कुलकर्णीच्या तीन सहकाऱ्यांनी गोमती फूड मिल्क प्रा. लि. नावाने एक कंपनी कागदावर स्थापन करून बँक ऑफ इंडियाकडे तब्बल कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्या वेळी बँकेने यांना तब्बल कोटी ८१ लाखांचे कर्ज मंजूर करून संबंधित कंपनीला रक्कमसुद्धा दिली होती.

या तिघांनी आपल्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या कंपनीकडून साहित्य खरेदी करणार असल्याचे सांगून त्या कंपन्यांचे कोटेशनसुद्धा बँकांना सादर केले होते. मात्र, त्या कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी यापूर्वी या बनावट कंपनीच्या तीन संचालकांपैकी नितीन बुरंगे या संचालकाला अटक केली असून, ताे सध्या पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असल्याने गुन्हे शाखा सर्व बाजूने बारकाईने तपास करीत आहे.

बँकेने कसे दिले कर्ज?
कोणत्याही प्रकारचा व्यवसाय या व्यक्तींनी सुरू केला नव्हता. तसेच बँकेला ज्या कंपनींचे कोटेशन दिले त्या कंपन्या अस्तित्वात नाही, असे पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणात पुढे आले. अशा परिस्थितीत बँकेने या त्रिकुटाला कर्ज दिले कसे, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. कारण सर्वसामान्य व्यक्तीला दुचाकीसाठी कर्ज जरी द्यायचे झाले तर कर्ज देण्यापूर्वी ‘ताकही फुंकून पिणारे’ बँक प्रशासन या प्रकरणात कसे काय फसले, ही चर्चा शहरात सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...