आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर अत्याचाराचा गुन्हा झाला दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वारंवार अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या आरोपीच्या ऐन लग्नात पीडित तरुणीने हंगामा केल्याने सोमवारी नवरदेवाची धांदल उडाली. पुणे येथील सदर पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर अंजनगाव सुर्जी येथील आरोपी अभिषेक राजेंद्र झाडे (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपीचा विवाह सुखरूप पार पडला असून, अद्यापपर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती. दरम्यान, पोिलसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास चाकण पोलिसांकडे सोपवला आहे.

पीडित तरुणीने अंजनगाव सुर्जी पोिलस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभिषेक झाडे दहा वर्षांपूर्वी खामगाव येथे शिक्षणासाठी शिकत असताना त्याचा चाकण (जि. पुणे) येथून शिक्षणासाठी आलेल्या पीडित तरुणीशी परिचय झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर तरुणी पुणे येथे परत गेली. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये अभिषेक झाडे याने पुणे येथे जाऊन सदर तरुणीचा मोबाइल क्रमांक मिळवून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर वारंवार मोबाइलवर संपर्क साधून दोघांच्याही गाठीभेटी वाढल्या. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी अभिषेकने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीशी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याने सदर तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने अभिषेक यास लग्न करण्यासाठी वारंवार मागणी केली. परंतु, आरोपीच्या सांगण्यावरून पुणे येथे आपण गर्भपात केला. या वेळी आरोपीही उपस्थित होता. त्यानंतर मात्र आरोपीने सदर तरुणीशी संबंध तोडल्याचे सदर तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर तरुणीने मित्रांच्या मदतीने अंजनगाव सुर्जी येथील डॉ. गांधी यांचा मोबाइल क्रमांक मिळवून आरोपीचे वडील राजेंद्र झाडे यांच्याशी संपर्क साधला असता राजेंद्र झाडे यांनी मुलगा घरी आलाच नसल्याचे सांिगतले होते. दरम्यान, सोमवारी सदर तरुणीने पुण्यावरून थेट अंजनगाव सुर्जी गाठले असता तिला आरोपीचे लग्न असल्याचे दिसून आले. लग्न मंडपात पीडित तरुणीने गोंधळ घातल्याने याची तक्रार फोनवरून राजेंद्र झाडे यांनी पोलिसात केली. यावरून पोिलसांनी पीडित तरुणीला ठाण्यात नेले असता तिने सदर आपबिती पोिलसांना सांगितली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ठाणेदार संजय लोहकरे यांनी आरोपी अभिषेक झाडे याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक करण्यात आली नसून पोिलसांनी लैंगिक अत्याचार गर्भपाताचा गुन्हा दाखल करून तपास चाकण पोलिसांकडे सोपवला आहे.