आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट : स्फाेटकाच्या गळतीमुळे गवत पेटले; १३० टन दारूगाेळा खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलगांव(वर्धा) - भारतातील सर्वात माेठ्या असलेल्या पुलगांव येथील लष्कराच्या केन्द्रीय दारूगोळा भांडारात ३० मे २०१६ च्या मध्यरात्री घडलेली दुर्घटना कल्पनातीत हाेती. एका स्फाेटकातून झालेल्या गळतीमुळे जाे काही बाका प्रसंग उद्भवला हाेता त्यावर मात करीत जवानांनी प्राणाची बाजी लावून हजारो टन दारूगोळा वाचविला.

या स्फोटाचे नेमके कारण काय? हे जरी अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, तरीही उपलब्ध माहितीनुसार अार. एस. पवार अाणि मनाेजकुमार या जवानांनी गळती हाेत असलेले स्फाेटक शेडमधून बाहेर अाणले मात्र विषारी काळ्याकुट्ट धुराचा लाेळ इतका प्रचंड माेठा हाेता की, त्यातील ज्वलनशिल घटकांमुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला, गळती सुरू असलेले स्फाेटक निकामी करण्याच्या हेतूने त्या ‘शेल’ची ‘की’ त्यांनी काढली तेव्हा स्फाेट झाला अन‌् अागीचे गाेळे वाळलेल्या गवतावर इतस्तत: पडले त्यामुळे अागीची तीव्रता वाढली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी हाेत असून या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

येथे झालेल्या शक्तीशाली स्फोटात तब्बल १३० टन दारूगोळा नष्ट झाला. हा दारूगोळा केवळ एका शेडमधील होता. लष्करी संकेतानुसार ‘डेल्टा १९२’ असे या शेडचे नाव, असे तीनशेहून अधिक शेड या ठिकाणी आहेत. २० डब्बे असलेली संपूर्ण मालगाडी या एका शेडखाली उभी राहू शकते एवढे मोठे शेडचे क्षेत्रफळ आहे. फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाचे जसे मोठमोठे गाेदाम असतात तशा इथल्या शेडमध्ये दारूगोळा साठविण्यात येतो. बंदुकीच्या गोळीपासून ते मिसाइलपर्यंत सर्वच प्रकारचा दारूगोळा या शेडमध्ये साठवला आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांना युद्धाच्या वेळी पुरवली जाणारी दारूगोळ्याची रसद याच भांडारातून पाठविण्यात येते.

पुढे वाचा...
स्फाेटकाच्या गळतीने घात
पुलगांवात तिसऱ्यांदा घडली दुर्घटना
बातम्या आणखी आहेत...