आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखवालदार दाम्पत्यावर हल्ला करून बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेताची रखवाली करणाऱ्या दाम्पत्यावर चार चोरट्यांनी काठ्या धारदार शस्त्राने हल्ला केला. इतक्यावर ते थांबले नाही, तर त्यांनी रखवालदाराला पकडून त्याच्या ५० वर्षीय पत्नीवर बलात्कार केला. हा थरकाप उडवणारा थरार शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरालगत नवसारी शिवारातील एका शेतात घडला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिस आयुक्तांसह पोलिस यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली होती.

नवसारी शिवारात स्वमालकीची एकर शेती याच शेताला लागून असलेली आठ एकर अशी एकूण १३ एकर शेती नवसारी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने लागवडीने केली आहे. त्यांनी मागील वर्षभरापूर्वी बाहेरगावी राहणाऱ्या एका दाम्पत्याला या दोन्ही शेतांच्या रखवालीसाठी आणले आहे. या रखवालदाराचे वय ५५ वर्षे, त्याच्या पत्नीचे ५० वर्षे आहे. आठ एकर असलेल्या शेतात झोपडी तयार करण्यात आली असून, याच झोपडीत रखवालदार दाम्पत्य राहत आहे. दरम्यान, याच शेताला लागून असलेल्या पाच एकर शेतात असलेली तूर कापली असून, त्या तुरीची गंजी शेतातच लावली आहे. जवळपास ३०० ते ३५० च्या आसपास पेंढ्या असल्याचे लागवडीने ज्यांनी शेत केले त्यांनी सांगितले. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रखवालदार दाम्पत्य झोपडी असलेल्या शेतातून बाजूच्या शेतातील तुरीची गंजी पाहायला गेले असता गंजीजवळ चार चोरटे होते. या दाम्पत्यानी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी या दाम्पत्याना बेदम मारहाण केली, इतकेच नाही, तर धारदार शस्त्राने दोघांवरही वार केले. त्यानंतर या चोरट्यांनी रखवालदाराला पकडून ठेवले त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. त्यानंतर चोरटे मात्र पसार झाले. या हल्ल्यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते अत्यवस्थ अवस्थेत तुरीच्या गंजीजवळच पडून राहिले. रात्री हे दाम्पत्य जेव्हा झोपडीतून बाहेर पडले त्या वेळी झोपडीत त्यांची मुलगी त्या मुलीचे बाळ होते. रात्रभर तिने आई वडिलांची प्रतीक्षा केली, मात्र अंधारात ती शोधणार तरी कुठे, रविवारचा दिवस उजाडला, तरी आईवडील घरी आले नाही म्हणून ती शोधत होती, दरम्यान, तुरीच्या गंजीजवळ दोघेही अत्यवस्थ अवस्थेत पडले होते. तिने धावतच ज्या व्यक्तीने हे शेत लागवडीने केले आहे, त्याचे घर गाठून त्यांना हा घटनाक्रम सांगितला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळ गाठले. पोलिस आले घटनास्थळाची पाहणी केली. हा गंभीर प्रकार असल्यामुळे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सोमनाथ घार्गे, आयुक्तालयातील सर्व एसीपी, नागपुरी गेटचे प्रभारी ठाणेदार सतीश जाधव, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार कैलास पुंडकर यांच्यासह इतर ठाण्यांचे ठाणेदार, सर्व ठाण्यांचे डीबी पथकासह मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला होता. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसात दरोड्याचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला बलात्कार या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच घटनास्थळावर पुरावे घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक पोहोचले होते.

दाम्पत्य रात्रभर रक्तबंबाळ अवस्थेत होते पडून : शनिवारीरात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर शनिवारची संपूर्ण रात्र जवळपास साडेसहा तास हे दाम्पत्य गंभीर जखमी अवस्थेत शेतातच पडून होते. या दाम्पत्यावर इर्विन रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

आरोपींचा शोध सुरू
हल्लेखोरांच्या शोधार्थआयुक्तालयातील १५० पोलिस गुंतले असून, शहरासह बाहेर ठिकाणीसुद्धा पथक शोधात रवाना झाले आहे. लवकरच आम्ही आरोपींपर्यंत पोहोचणार आहोत. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.

१५० पोलिसांचे १२ पथक झाले रवाना
या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आयुक्तालयातील सर्व ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना नागपुरी गेटला बोलावून आरोपीच्या शोधासाठी तब्बल १५० पोलिसांचे १२ पथक तयार केले आहेत. हे पथक हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहे.