आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहकर फाट्यावर पकडला 27 लाखांचा गुटखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली- ट्रकमध्ये टोमॅटोच्या कॅरेटमागे लपवून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिखली येथील मेहकर फाट्याजवळ आज दुपारी वाजेदरम्यान सुमारे २७ लाख ८१ हजार रुपयांचा पकडल्याची घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. 

चिखली येथील मेहकर फाट्यावर गोवा कंपनीच्या गुटखा पुड्यांनी एमएच २८ एबी ८८१६ हा ट्रक भरलेला असल्याची गुप्त बातमी जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीणा यांना मिळाली. त्यांनी एलसीबीला याबाबत निर्देश दिले. एपीआय विनय कोरेगावकर यांच्या नेतृत्वात एएसआय प्रकाश राठोड, हेकॉं केशव नागरे, पोलिस कर्मचारी विलास साखरे, विलास काकड, विजय दराडे, गजानन अहिरे, साळोख यांच्या पथकाने मेहकर फाट्यावर पोहोचून केजीएन धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली. त्यात गुटखा आढळल्याने ट्रक जप्त करण्यात आला. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पी.के.चव्हाण हे सुध्दा पथकासह मेहकर फाट्यावर दाखल झाले होते. पोलिसांनी ट्रक आणि ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. चिखली येथील निसार हजीब यांचा गुटखा असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन अधिकारी चव्हाण यांनी दिली. 

४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
स्थानिक मेहकर फाट्याजवळ असलेल्या के.जी.एन. ढाब्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या ट्रक मधून गोवा कंपनीचा अंदाजे २७ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. या गुटख्यासोबत ७२ मोठे कॅरेट किंमत अंदाजे ३,००० रुपये , ट्रक किंमत अंदाजे १२ लाख रुपये असा एकूण ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

गुटख्याच्या १६ हजार ५०० पुड्या...
ट्रकची तपासणी करण्यासाठी ट्रक रिकामा करण्यात आला. त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या ५० पोत्यांमध्ये गोवा कंपनीच्या गुटखा आढळला. एका पोत्यांमध्ये बॅग असे एकूण ३०० बेग एका बॅगमध्ये ५५ पुडे असे एकूण १६५०० पुडे निघाले. त्याची बाजार किंमत २७ लाख ८१ हजार रुपये असल्याची माहिती कोरेगावकर यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...