आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hair Dresser From Akola Cut Hair With 11 Scissors.

एका हातात 11 कैची घेऊन कापले केस, \'गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड\'चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 कैची हातात घेऊन केशकर्तन करताना शिव खापरकर... - Divya Marathi
11 कैची हातात घेऊन केशकर्तन करताना शिव खापरकर...
अकोला- अकोल्यातील शिवा खापरकर या युवकाने रविवारी एका हातात 11 कैची पकडून केशकर्तन केले. विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी त्याच्या या कामगिरीची व्हिडिओ रेकॉर्डिंग 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ला पाठविण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी रिअॅलिटी शोमध्ये एका जपानी व्यक्तीने एका हातात दहा कैची घेऊन केशकर्तन केल्याचा विक्रम आहे. यापूर्वी शिवाने सन 2012 मध्ये 20 तासांत तब्बल 407 जणांचे केशकर्तन करून 'लिम्का बुक'मध्ये नाव नोंदवले होते. अकोल्यातील हॉटेल तुषार येथे रविवारी शिवा खापरकर यांच्या विश्वविक्रमासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तीन वर्षे केला सराव-
शिवा खापरकरांच्या 2012 मध्ये 20 तासात 407 जणांच्या केशकर्तनाचा विक्रम केला असून, त्याची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. तीन वर्षांपूर्वी रिअॅलिटी शोदरम्यान, जपानच्या गुंन करोनाने एका हातात 10 कैची घेऊन केशकर्तन केले होते. तेव्हापासून त्याचा रेकॉर्ड तोडून, नव्या विक्रमासाठी 11 कैची एका हातात घेऊन शिवाने सराव सुरू केला. या विश्वविक्रमात त्याने पुरुषाचा फेदर कट, महिलेचा लेझर कट केला.
विक्रमासाठी पाठवले व्हिडिओ रेकॉर्डिंग-
शिवा खापरकर यांनी महिलेचा लेयर कट, तर पुरुषाचा फेदर कट एका हातात 11 कैची घेऊन केला. त्यांच्या या प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ते व्हिडिओ पाठवण्यात आले आहेत. याचे परीक्षण प्रा. मधू जाधव, गजानन घोंगडे, किशोर बळी, गोपाल कदम, प्रवीण बुरघाटे यांनी केले.
शिवाने अकोल्याला जागतिक स्तरावर नेले- पालकमंत्री
आपल्या व्यवसायाला, आपल्यातील कलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम शिवा खापरकरने केले आहे. त्याने त्याच्या कलेच्या माध्यमातून शहराला विश्वस्तरावर पोहोचवले आहे. ही अकोल्यासाठी भूषणाची बाब आहे', असे भावोद्गार पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी काढले. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिवा खापरकरच्या कलेचे कौतुक केले. प्रत्येकामध्ये कला असते, पण इच्छाशक्तीच्या बळावर काहीतरी वेगळे करता येते. कला जोपासून उदरनिर्वाहच करता, त्याला जागतिकस्तरावर पोहोचवण्याचे कार्य करणे अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले.
पुढे पाहा, शिव खापरकर याच्या कलेची दर्शन घडविणारी छायाचित्रे....