आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा: गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर- केंद्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक कर्ज योजना अतिशय महत्वाकांक्षी आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी १९ सप्टेंबर रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जिल्हाभरातील युवक तसेच व्यवसायीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी चांदा क्लब ग्राऊंड येथे सदर महामेळावा होणार आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीच्या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, पोलीस उपअधिक्षक जयचंद काठे, अग्रणी बँक प्रबंधक आय.आर.गिरडकर, मनपा उपायुक्त डॉ.विजय इंगोले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. बँकानी मोठया प्रमाणावर मेळाव्यात सहभागी होवून अधिकाधिक कर्ज वाटपासाठी हातभार लावावा अशा सूचनाही अहीर यांनी बैठकीत केल्या. यावेळी मेळाव्याच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला. या मेळाव्यात राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा सहकारी २४ बँका सहभागी होत आहे. या बँकांच्या वतीने मुद्रा योजनेसह प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, सुकन्या समृध्दी योजना, अटल पेन्शन योजना या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच योजनांचे अर्जही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. योजनांसह सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध व्यवसायाचे मार्गदर्शनही तज्ज्ञ व्यक्तीव्दारे यावेळी दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना यासोबतच विविध बाबींचीही माहिती मेळाव्यात दिली जाणार असून त्याचा आढावाही अहीर यांनी बैठकीत घेतला.
बातम्या आणखी आहेत...