आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harabhara Government Purchase News In Divya Marathi

हरभऱ्याचीही आता शासकीय खरेदी; हालचालींना आला वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खुल्या बाजारात चढ्या दराने तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत असताना याच पद्धतीने हरभरा खरेदी करण्याच्याही हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. दरम्यान, त्वरित हरभऱ्याची खरेदी सुरू करण्याचे निर्देश 'एफसीआय'ला देण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने खुल्या बाजारभावाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत असल्याने बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीचे भाव स्थिर असून, शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत आहे. मागील वर्षी तुरीची शासकीय खरेदी झाल्यामुळे उत्पादन कमी झाले असताना शेतकऱ्यांना सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने तूर विकावी लागली होती. शेतकऱ्यांकडील तूर संपल्यानंतर मात्र तुरीचे दर १३ ते १४ हजार रुपये प्रती क्विंटल गेल्याने या भाववाढीचा फायदा खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात झाला होता.

या वर्षीही तुरीचे उत्पादन कमालीचे घसरले आहे. परंतु, बाजारात सध्या एफसीआय नाफेडच्या वतीने तुर खरेदी करण्यात येत असल्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्यांच्या हाती तुरीचे पीक लागले अशा शेतकऱ्यांना या स्पर्धेचा समाधानकारक फायदा होत अाहे. दरम्यान, तुरीपाठोपाठ हरभऱ्याचीही त्वरित खरेदी करण्यात यावी, असे पत्र केंद्र शासनाच्या वतीने एफसीआयच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाले आहे. दरम्यान, सध्या हरभऱ्याचे उत्पादन कमालीचे घटले असतानाही मागील वर्षीच्या तुलनेत बाजारात हरभऱ्याला किरकोळ भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हरभरा खरेदीत स्पर्धा नसल्यामुळे खरेदीदारांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे याचा जबर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक तुरीची शासकीय खरेदी अमरावती येथे झाली अाहे. अमरावती जिल्ह्यात २१ हजार ६९६ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.

"एफसीआय'च्या खरेदी बंदमुळे पुन्हा तूर घसरली
बाजारसमित्यांमध्ये शासकीय तूर खरेदी सुरू झाल्यामुळे कमाल दर ९४०० पर्यंत गेले होते. शनिवारी (दि. १३) सुटी आल्यामुळे एफसीआयची खरेदी बंद असल्याचा फायदा घेऊन तुरीचे दर कमाल सरासरी ८४०० रुपयांपर्यंत घसरले .बुधवारीही खरेदी बंद राहिल्याने तुरीचे किमान दर ७७०० रुपयांपर्यंत घसरले. दरम्यान, उद्या (दि. १८) पुन्हा शासकीय खरेदी सुरू होईल.

शासकीय खरेदीमुळेच तुरीचे भाव आहेत स्थिर
^शासनाच्यामार्फतबाजारात तूर खरेदी करण्यात येत असल्यामुळे भाव स्थिर आहेत. याचा फायदा अडचणीतील शेतकऱ्यांना होत आहे. नितीन हिवसे, संचालक,राज्य मार्केटिंग फेडरेशन

हरभरा खरेदीसाठी पत्र
^त्वरितहरभराखरेदीसाठी शासनाचे पत्र प्राप्त झाले असून, लवकरच खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे. अशोक देशमुख, जिल्हामार्केटिंग अधिकारी