आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटचे हरिसाल डिजिटल युगाचे ‘व्हिलेज’, मायक्रोसॉफ्टकडून काम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मेळघाटातील हरिसाल हे खेडे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ होणार आहे. मुंबईत मायक्रोसॉफ्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. वर्षभरात अशी पन्नास खेडी-वस्त्यांना डिजिटल करण्याची सरकारची योजना आहे. मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यात भारतातील गाव डिजिटल करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली होती. मेळघाटातील अमरावती बैतुल रस्त्यावरील हरिसालची त्यासाठी झाली होती.

असे असेल डिजिटल व्हिलेज, गावातील दुकानांत स्वॅपिंग मशीन
इंटरनेट मोबाइल गतिमान इंटरनेट सेवा, २४ तास वीज-मोबाइल सेवा उपलब्ध करून सर्व व्यवहार ऑनलाइन होतील. ऑप्टिकल फायबर, मोबाइल टॉवरद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी. सोलर पॉवरची उभारणी करून विजेचा प्रश्न सोडविणार.
अर्थ : प्रत्येक बँक खातेदाराला डेबिट कार्ड. दुकांनांत कार्ड स्वॅपिंग मशीन बसवल्या जातील. एटीएमच्या माध्यमातूनही सुविधा मिळेल. मोबाइल बँकिंगचाही विस्तार होईल.
कृषी : जागतिक पातळीवरील कृषिविषयक घडामोंडींची माहिती गावातील इलेक्ट्रॅनिक्स डिस्प्लेवर दिसेल. यामुळे कृषीमालाची विक्री करताना शेतकऱ्यांना फायदा होईल.
आरोग्य : आरोग्यविषयक सर्व घडामोडी सरकारी दवाखान्यातील डिस्प्ले फलकावर झळकतील. अंगणवाडीतील सर्व मुलांच्या नोंदी, वजन, सुधारणेच्या नोंदी ऑनलाइन होतील. गावकऱ्याचे हेल्थ कार्ड बनेल.
शिक्षण : शाळेत डिजिटल फळा असेल. अंगणवाडी सेविका व शिक्षकांना मायक्रोसॉफ्टद्वारे संगणक साक्षरतेचे धडे मिळतील. शाळेतील विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मोबाइल टेक्नॉलॉजी प्रशिक्षण. यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल.
१०० दिवसांत होणार डिजिटल व्हिलेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममधील विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ खवसे, अद्वैत सावरकर, मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख प्रशांत शुक्ला, बालचंद्रन नायर आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी १४ सप्टेंबरला हरिसालची पाहणी करून डिजिटल व्हिलेजचा कृती आराखडा तयार केला होता. त्यानंतरच्या १०० दिवसांत अंमलबजावणी करून कायापालट केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...