आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींचा गांजा जप्त, सहा अटकेत; आंतरराज्यीय टोळीचा नागपुरात पर्दाफाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- कार अपघाताचे निमित्त झाले आणि पोलिसांच्या हाती गांजाची आंतरराज्य तस्करी करणारी टोळी लागली. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल कोटी रुपयांचा हजार किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी अमितसिंह तोमर (रा. मथुरा, उत्तर प्रदेश), विजय कोई (रा. दिल्ली), मनीषसिंह, रामशरण सिंह, निखिलेश बक्षी, नागुला शिवडू यांना अटक करण्यात अाली.

काटोल-सावरगाव मार्गावर चिखली येथे सोमवारी कारला अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता अपघातग्रस्त कारमध्ये दोनशे किलो गांजा सापडला. या वेळी पोलिसांनी कारमधील अमितसिंह तोमर आणि विजय कोई यांना अटक केली. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांची नावे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कोंढळीजवळील मरकसूर येथील फार्म हाऊसवर छापा घातला. तिथे एका िटप्परमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा भरलेली पोती आढळून आली. त्यामुळे फार्म हाऊसचा मालक मनीषसिंह त्याचे साथीदार रामशरणसिंह, निखिलेश बक्षी आणि नागुला शिवडू यांनाही पाेलिसांनी अटक केली.

दिल्लीकडे जात होता गांजा
गांजाचा हा साठा दिल्लीकडे नेण्याची टोळीची योजना होती. हा साठा िवशाखापट्टणम येथून अाणला हाेता.मनीषसिंह हा म्होरक्या असून गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यामार्फत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्लीकडे गांजाची वाहतूक सुरू होती, असे सूत्रांनी सांगितले. या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न असून त्यातील आणखी काही जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके आंध्र प्रदेश तसेच दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रथमच मोठी कारवाई
विदर्भात एकाच वेळी एवढा मेाठा गांजाचा साठा जप्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला. काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिकेतूनही गांजा नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...