आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी प्रकरणाची आता शुक्रवारी सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झालेली नसल्याने या नावाने संघटना नोंदणीचा अर्ज सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी केला. त्यावर सार्वजनिक िवश्वस्त संस्था नोंदणी कार्यालयाच्या सहायक धर्मादाय आयुक्त करूणा पत्रे यांच्याकडे सोमवार १८ रोजी सुनावणी झाली. दीपक वसंतराव बरड प्रशांत कमलाकर बोपर्डीकर यांचे वकील श्रीगणेश अभ्यंकर यांना जनार्दन मून यांनी त्यांनी मागणी केल्या प्रमाणे संस्थेची कागदपत्रे सादर करावी, असे आदेश पत्रे यांनी दिले. पुढील सुनावणी शुक्रवार २२ रोजी ठेवली. 

चंद्रपूर येथील अॅड. राजेंद्र चिंतामण गुंडलवार तसेच दीपक वसंतराव बरड प्रशांत कमलाकर बोपर्डीकर यांनी लेखी आक्षेप नोंदवल्याने सुनावणी १८ पर्यत पुढे ढकलण्यात आली होती. या दोघांच्या लेखी आक्षेपांना मून यांनी दिलेल्या उत्तरात नाकारले होते. दोघांनी केवळ लेखी आक्षेप घेतले. मात्र सोबत पुरावे जोडले नाही. त्यामुळे यांच्या आक्षेपात काही तथ्य नसल्याने ते रद्द करून लवकरात लवकर नोंदणी करण्यात यावी, अशी िवनंती मून यांनी केली होती. त्यावर १८ ला सुनावणी घेण्यात आली. 

कोणत्याही संस्थेला राष्ट्रीय हे नाव लावता येणार नाही. तसा शासन निर्णय असून, सोसायटी अॅक्टमध्ये तशी तरतूद आहे. सरकार आश्रयदाता असेल अशा संस्थेला राष्ट्रीय हे नाव वापरता येणार नाही, असा आक्षेप बोपर्डीकर यांचे वकील अॅड. श्रीगणेश अभ्यंकर यांनी घेतला होता. १८ ला झालेल्या सुनावणीत अॅड. श्रीगणेश अभ्यंकर यांनी कागदपत्रे मागितल्यावर मून यांनी त्याला आक्षेप घेतला होता. 
बातम्या आणखी आहेत...