आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राज्‍यात यंदा पूर्व विदर्भातून मान्‍सून दाखल, अमरावतीत धो-धो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दरवर्षी गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी मात्र पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी या संदर्भात माहिती दिली. सायंकाळी अमरावती शहर परिसरात धो-धो पाऊस पडला. परिसरातील ओढे, रस्‍ते भरुन वाहू लागले आहेत. अचानक आलेल्‍या पावसाने बाजार परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
- दोन दिवसात मान्सून सक्रीय होणार असल्‍याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे.
- कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.
- महाराष्ट्रात सध्‍या मान्सूनतेच्या सक्रीयतेसाठी अनुकूल वातावरण आहे.
- बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्‍ये मान्सून दाखल झाला आहे.
- बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक व केरळ आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्‍यात आला आहे.
- विदर्भातील अनेक भागात शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तर, राज्‍यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
छायाचित्र- मनीष जगताप.
पुढील स्‍लाइड्सवर पहा, अमरावतीत असा बरसला पाऊस..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...