आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम, नदी-नाल्यांना पूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतात पाणी तुंबल्यामुळे पेरण्या झालेल्या शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात विदर्भ नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील पुर्णा प्रकल्पाचे तीन तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात चालू आठवड्यापासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. जून पासून पुढील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सोमवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेल्याने दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, तिवसा तालुक्यात पेरण्या दडपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांची वेळ आली आहे. त्यातच गुरवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे दुबारसह पेरण्या लांबल्या आहेत. तब्बल एक महिना पाऊस उशीरा आल्याने विलंब झालेल्या पेरण्या या पावसामुळे पुन्हा लांबल्या आहेत. याचा परिणाम तूर, मूग, उडदाच्या उत्पादनावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसामुळे तिवसा तालुक्यातील मोझरी, शिरजगाव, धोत्रा, सालोरा, तळेगाव, तिवसा, शेंदूरजना बाजारसह संपूर्ण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सूर्यगंगा नदी दुधडी भरून वाहू लागलीआहे. धामणगाव तालुक्यात विदर्भा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील गावांचा तिवसा तालुक्यासोबत संपर्क तुटला. चांदूर रेल्वे शहरातील महालक्ष्मी नगराला पाण्याचा वेढा बसला आहे. संततधार असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बगाजीसागर, पूर्णा धरणाचे दरवाजे उघडले : जिल्ह्यातीलबगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे १५ सेंमी पर्यंत उघडण्यात आले असून ३१७ दलघमी पाण्याचा विसर्ग केला जात आहे, तर चांदुर बाजार तालुक्यातील पुर्णा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. धरण परिक्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिवसा तालुक्यात सर्वाधिक पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४४७ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात झाला. जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली. मागील चोिवस तासातील आतापर्यंत झालेला तालुकानिहाय एकूण पाऊस पुढीलप्रमाणे अमरावती १२ मिमी (२१९ मिमी), भातकुली मिमी (१९२ मिमी), नांदगाव खंडेश्वर १० मिमी (२४९ मिमी), चांदुर रेल्वे १९ मिमी (२८१ मिमी), धामणगाव रेल्वे १८ मिमी (२७६ मिमी), तिवसा मिमी (४४७ मिमी), मोर्शी १० मिमी (४०८), वरुड मिमी (२४३ मिमी), अचलपूर ११ मिमी (२४६ मिमी), चांदुर बाजार मिमी (३०७ मिमी), दर्यापूर मिमी (२५० मिमी), अंजनगाव सुर्जी मिमी(२१६मिमी), धारणी मिमी (१९९ मिमी), चिखलदरा १२ मिमी(२४८ मिमी) पाऊस झाला आहे. पावसाची नोंद ही शुक्रवारी सकाळी वाजेपर्यंतची आहे.
चांदूर रेल्वे तहसील परिसरातील महाकाय वटवृक्ष कोसळला
चांदूररेल्वे तहसील कार्यालय परिसरात असलेला १०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष संततधार पावसामुळे पंचायत समितीचें अभियंता निंबोदे यांच्या चारचाकीवर कोसळल्याने तिचे नुकसान झाले. सुदैवाने गाडीमध्ये कुणीही नसल्याने जीवित हानी टळली. संततधार पावसामुळे धामणगाव तालुक्यासह अन्यत्रही झाडे उन्मळून पडली.

बातम्या आणखी आहेत...