आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा ८,८०३ हेक्टरवरील पिकांना बसला मोठा तडाखा,नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजार ८०३ हेक्टरवरील पिकांना पावसाचा जबर फटका बसला आहे. सातपुडा पर्वत रांगात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उर्ध्व वर्धा धरणाचे तीन, शहानूरचे दोन, पुर्णाचे नऊ तर सापन धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्या काठची जमीनही मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे पिकांसह मातीचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्ष सातत्याने दुष्काळ नापिकीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना संततधार पावसाने जबर झटका दिला आहे. नदी नाल्याकाठावरील सुमारे एक हजार ४२४ हेक्टरवरील शेत जमीनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जून पासून ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाने १६ जणांचे बळी घेतले आहेत. यापैकी ११ मृतकांच्या कुटुंबियांना ४४ लाख रुपयांची मदत शासनाच्यावतीने देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले असून, आंबिया बहाराच्या संत्र्याची प्रचंड गळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी भीषण संकटात सापडले आहेत. पावसामुळे साथीच्या विविध आजारांनी डोके वर काढल्यामुळे परतवाडा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

महिनाभरात पावसाचे १६ बळी :
गेल्यामहिनाभरामध्ये जिल्ह्यात १६ जण वाहून गेले आहेत. त्यापैकी जण पुरात, तीन जण अन्य कारणाने जणांचा वीज पडून मृत्यू झाला.

‘त्या’ बालकाचा मृतदेह आढळला
नल दमयंती नदीच्या पेठपूरा भागातील पुलावरून आशु उर्फ मुफ्ती मोहम्मदी मेहबुब खाँ (११) बालक वाहून गेला होता. बुधवारी मासेमारांच्या मदतीने पोलिसांनी करजगाव परिसरातत शोध घेतला असता त्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे.

सातपुडा पर्वतरांगात पाऊस सुरू असल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे तीन, शहानूरचे दोन, पुर्णाचे नऊ तर सापन धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अचलपुरातील गोंडविहीर तलाव ओव्हरफ्लो झाला. उर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के, शहानुर ७४.२६ टक्के, चंद्रभागा ६८.०७ टक्के, पुर्णा ६९.१३ टक्के, सपन ७२.९० टक्के जलसाठा निर्माण झाला असून, ७७ लघु प्रकल्प ६९.५७ टक्के भरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...