आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात चार तासांच्या पावसात अकरा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
नागपूर - गुरुवारी सकाळी सतत चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्हा आणि शहरात अकरा जणांचा बळी गेला. एवढ्या कमी वेळेत झालेल्या भयंकर पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती ऊर्जामंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने मृताच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत देणार असून पडलेल्या घरांना आर्थिक मदतीसाठी सोमवारपर्यंत अहवाल मागवण्यात आला आहे. तोपर्यंत नागरिकांसाठी ठिकठिकाणी अन्नदालने सुरू करण्यात आली आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.