आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rainfall In Vidharbha Washim Wardha Nagpur

PHOTOS: उपराजधानीत रस्‍त्‍यांवर तीन ते चार फूट पाणी; चौघे वाहून गेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका रुग्‍णालयातील पार्किंगमधील वाहने अशी पाण्‍यात बुडाली होती. - Divya Marathi
एका रुग्‍णालयातील पार्किंगमधील वाहने अशी पाण्‍यात बुडाली होती.
छाया - महेश टिकले
नागपूर - शहरात सलग 18 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे शहरातून वाहणाऱ्या नाग व पिवळी या नद्यांना पूर आला असून, सर्व तलाव शंभर टक्‍के भरले आहेत. प्रमुख रस्‍ते, चौक या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. त्‍यामुळे वाहतूक ठप्‍प झाली आहे. दरम्‍यान, नारा येथे चार जण बेपत्‍ता असून, ते वाहून गेल्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.
80 टक्‍के शहर पाण्‍याखाली; शेकडो वस्‍त्‍यांचा संपर्क तुटला
कधी नव्‍हे ते नागपूरमध्‍ये पावसाचा कहर झाला. यामुळे 80 टक्‍के शहर पाण्‍याखाली असून, शेकडो वस्‍त्‍यांचा संपर्क तुटला आहे. डोबीनगर आणि जोगीनगर येथे तर साहा ते सात फुटांपर्यंत पाणी साचले होते.
उड्‌डाणपुलांवरुनही पाणी
या पाऊस एवढा मुसळधार होता की, शहरातील काही उड्‌डाणपुलांवरून धबधब्‍याप्रमाणे पाणी वाहत होते. शहरातील अंबाझरी, शुक्रवारी आणि गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक कार, बस, दुचाक्‍या पाण्‍यात अडकून पडल्‍या आहेत.
पूर्व नागपूरमधील नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी
पूर्व नागपूर भागातील अनेक वस्‍त्‍या पाण्‍याखाली आल्‍याने महापालिका प्रशासनाने या भागातील बहुतांश नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलवले आहे. बुधवारी रात्रीपासून नागपूर येथे मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. त्‍यामुळे शाळांनाही सुटी देण्‍यात आली.

विमान उड्डाण रद्द
नागपूर येथून उड्डाण करणारी विमाने पावसामुळे रद्द करण्‍यात आलीत तर नागपूरमध्‍ये आज (गुरुवार) एकही विमान उतरवले गेले नाही. पावसाचा रेल्‍वे, बसवर परिणाम झाला. रेल्‍वे स्‍थानकामध्‍ये गुडघाभर पाणी साचले होते.
धरणाचे दरवाजे उघडले
उतिवृष्‍टीमुळे नद्यांना पूर आल्‍याने निम्न वर्धा प्रकल्पाचे १७ दरवाजे ३० सेंटी मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले आहे. त्‍यामुळे वर्धा जिल्‍ह्यातील अनेक गावांना सर्तकतेचा इशारा देण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...