आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दप्तर ओझे तपासणीसाठी ४७ पथक, जिल्ह्यात ३८ तर महापालिकेत पथकांची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ४७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुकास्तरावर ३८ तर महापालिका क्षेत्रात पथकांकडून दप्तरांची तपासणी केली जाणार आहे. दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी शिक्षण विभागाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे.
शारीरिक मानसिक आरोग्य टिकून राहावे म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. शासनाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून पहिल्या दिवसापासून शाळांमध्ये अभिनव उपक्रम राबवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळता अन्य बोर्डाच्या शाळांमधील दप्तराचे वजन अधिक असल्याचे मागील शैक्षणिक सत्रातील तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी अन्य बोर्डाच्या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तरात ओझे असणार नाही, याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर तीन सदस्यीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार अधीक्षक या पथकाचे प्रमुख राहणार आहे. जुलै महिन्यात दप्तराचे ओझे तपासण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

असे राहील पथक
तालुकास्तरावरतीन सदस्यीय पथक राहणार आहे. शालेय पोषण आहार अधीक्षक पथक प्रमुख राहणार असून, विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुखांचा या पथकात समावेश राहणार आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हास्तर पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...