आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोझरीच्या आगग्रस्त वृद्ध महिलेला दिला मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - एकमहिन्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात दिवा खाली पडल्याने ७० वर्षीय म्हातारीची झोपडी जळाल्याने त्या वृद्धेचा संसार उघड्यावर आला. त्यामुळे रहावे कसे जगावे कसे असा प्रश्न तुळजाबाई सावंत यांच्यापुढे उभा ठाकला होता, परंतु येथील तलाठ्यांच्या पुढाकाराने तुळजाबाईंच्या डोक्यावर छताची निर्मिती करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला असून केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर नागपूर पुणे येथून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहे.
एक महिन्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तुळजाबाईच्या संसाराची राख रांगोळी झाली. यापूर्वीच त्यांच्या पतीने, मुलाने सुनेने जगाचा निरोप घेतला. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करताच येथील तलाठ्याने दोन हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यानंतर ितवसा, मोझरी यासह नागपूर पुणे येथून मदतीचा ओघ सुरू झाला असून आतापर्यंत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत धान्याची मदत त्यांना मिळाली आहे. मोझरी येथील नामदेव मुंगले यांनी एक हजार रुपये, तलाठी सदानंद मसके यांनी दोन हजार रुपए, तर नागपूर तिवसा येथील लोकांनी सामाजिक बांधिलकी जपत नऊ हजार रुपए महिनाभर पुरेल इतका किराणा दिला आहे. जिथे लोकप्रतिनिधींनी तुळजाबाईंकडे पाठ फिरवली, तिथे नागपूरचे राजु ढोमने, वासुदेव गनोरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा मंचचे अध्यक्ष अमर वानखडे, रवी वैद्य, रवींद्र ढोमने, आशिष कोल्हे, संकेत कुबडे, विवेक काळे, सचिन शिंदे, प्रितम सरोदे, नीलेश ठाकरे, गणेश वानखडेसह आदींनी तुळजाबाईला मदत करून सामाजिक बांधिलकी जपली, तर गावातील युवकांनी त्यांचे घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही.

हे सर्व "दिव्य मराठी'मुळेच
^माझेघर जळाल्याने डोक्यावरचे छतच गेल्याने जगावे कसे रहावे कसे हा प्रश्न पडला होता. सामान्य माणूस वगळता एकाही लोकप्रतिनिधीने मदत केली नाही. दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रकाशित केले मदतीचा ओघ सुरू झाला. तुळजाबाई सावंत.
बातम्या आणखी आहेत...