आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उरण’च्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा अतिदक्षतेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नवीमुंबईतील उरण परिसरात तीन दिवसांपूर्वी चार शस्त्रधारी व्यक्ती विद्यार्थिनींना दिसले. हे व्यक्ती नेमके कोण? यातच आगामी काळात राज्यासह देशात नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातही हाय अलर्ट आला असून, त्या दृष्टीने पोलिस, बॉम्बशोधक, नाशक पथकाने तपासणी मोहीम सुरू केली आहे.
देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या हालचाली, तीन दिवसांपूर्वी नवी मुंबई परिसरात विद्यार्थिनींना दिसलेले चार शस्त्रधारी व्यक्तींमुळे सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. आठ दिवसाने नवरात्री उत्सव सुरू होत आहे. शहरात अंबा एकवीरा मातेचे मंदीर आहे, या मंदीरात नवरात्रीमध्ये भाविकांची गर्दी राहते. यातही सद्या असलेली परिस्थिती लक्षात घेता शुक्रवारी २३ सप्टेंबरला एसीपी मिलींद पाटील यांनी पथकासह अंबादेवी एकविरादेवी मंदीर परिसराची पाहणी केली, मंदिराच्या पदाधिकाऱ्यांसाेबत सुरक्षेविषयी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्णालय या गर्दींच्या ठिकाणी नागरिकांना संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केेले आहे.

गर्दीच्या ठिकाणांची तपासणी केली सुरू
^सद्या असलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर आम्ही रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्णालय अन्य गर्दीच्या ठिकाणांची तपासणी केली आहे. दरदिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन तपासणी केली जात आहे. नागरिकांना काही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधावा. प्रदीपसिंगपरदेशी, पोलिस निरीक्षक बीडीडीएस.

मुख्याध्यापकांसह प्राचार्यांसोबत बैठक
^आगामीकाळात जिल्ह्यात नवरात्री उत्सव साजरा होणार आहे, तसेच सद्या असलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. सोबतच दोन ते तीन दिवसात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक घेवून शाळा, महाविद्यालय परिसरातील सुरक्षेबाबत चर्चा करणार आहे. दत्तात्रय मंडलीक, पोलिस आयुक्त.
बातम्या आणखी आहेत...