आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अमरावतीत हायप्रोफाइल देहविक्रीचा भांडाफोड, 6 तरुणी ताब्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील कठोरा मार्गावरील एका प्रशस्त अपार्टमेंटमध्‍ये दोन फ्लॅटमध्‍ये देहविक्रीचा व्‍यवसाय करणा-या सहा युवतींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. मागील दोन महिन्‍यांपासून एका महिलेने या अपार्टमेंटमध्‍ये दोन फ्लॅट भाड्याने घेतले. घरमालक अमरावतीत राहत नसत्‍याने त्‍यांच्‍या फ्लॅटमध्‍ये हा गोरखधंदा सुरू होता. गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. दलालांच्‍या माध्यमातून ग्राहक अड्ड्यावर..
- दलालांच्‍या माध्‍यमातून हायप्रोफाईल अड्ड्यावर ग्राहकांना आणले जात होते.
- कमिशन तत्‍त्‍वावर हा व्‍यवसाय येथे चालवला जात होता.
- अमरावतीमध्‍ये यापूर्वीही अनेकदा अशी प्रकरणं उघडकीस आली आहेत.
- या युवती चंद्रपूर, अमरावती व गुजरातमधील रहिवाशी असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.
- कारवाईदरम्‍यान उपायुक्‍त सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक दिलीप पाटील उपस्‍थित होते.
पोलिसाच्‍या पंटरने मुलीला खोलीत नेले अन्..
- गाडगेनगर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत येणा-या कठोरा नाका परिसरातील आनंदवाडीमध्‍ये ही घटना उघडकीस आली.
- येथील एका दुमजली इमारतीमध्‍ये दोन महिला पाच मुलींना घेऊन देहविक्रीचा व्‍यवसाय करत होत्‍या.
- मिळालेल्‍या गुप्‍त माहितीनुसार छापेमारी करत पोलिसांनी या मुलींना रंगेहात पकडले.
- पोलिसांनी आपला पंटर अाधी ग्राहक म्‍हणून पाठवला.
- पोलिसांनी पंटरकडे 1500 रूपये दिले होते.
- पोलिसांचा पंटर भाव ठरवून एका खोलीत मुलीला घेऊन गेला.
- नंतर तत्‍काळ घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले.
'कस्टमर'ने फ्लॅटमधून घेतली उडी
पोलिसांनी फ्लॅटवर छापेमारी केली तेव्‍हा अकोला येथील इंगळे नामक एक युवक अश्लिल चाळे करीत असताना दिसला. स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने फ्लॅटच्या मागील बाजूस उडी घेतली. मात्र पळून जाण्‍यात तो अपयशी ठरला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. डीसीपी सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वात क्राईम ब्रांचने धाड टाकून युवतींना ताब्यात घेतले.
फ्लॅट कुणाचा माहित नाही
कठोरा मार्गावरील या नवीन फ्लॅटमध्ये हा कुंटणखाना गेल्या दोन महिन्यापासून सुरू होता. परंतु या फ्लॅटच्‍या मालकाचा कुणाला पत्‍ता नाही. मालकाचा रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता. हा फ्लॅट कुणाचा आहे. येथे असा व्‍यवसाय चालतो याची कल्‍पना फ्लॅट मालकाना ही का, या प्रश्‍नांचा शोध पोलिस घेत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, छापेमारीनंतर युवतींची उडाली तारांबळ..