आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्‍स रॅकेट चालवणाराच टाकत असे छापा; नागपुरातील निवृत्‍त सैनिकाचा कारनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर – येथील हिंगणा परिसरात राहणारा एक निवृत्‍त सैनिक देह विक्रीच्‍या धंद्यासाठी एजंट बनवून ग्राहक शोधून आणत असे. नंतर तोच पोलिस असल्‍याची बतावणी करून छापा टाकायचा आणि आंबट शौकीन ग्राहकांकडून पैसे उकळायाचा. या प्रकाराचा भांडाफोड झाला असून, पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली. माजी सैनिक चंद्रप्रकाश वारवतकर (४७), अमोल पाटील (२५) आणि सोनाली (बदलेले नाव ३०) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. हे तिघे हिंगणा परिसरातील राय टाऊनमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असत. त्‍यांच्‍याकडे बनावट ओळखपत्रेसुद्धा सापडली आहेत.
अशी करत होते फसणूक
सोनाली ही देहविक्री व्‍यवसाय करते. तिच्‍यासाठी अमोल आणि चंद्रप्रकाश हे ग्राहक शोधून आणत तर सोनालीच्‍या ओळखीचे काही ग्राहक थेट येत. दरम्‍यान, चंद्रप्रकाश आणि अमोल हे पोलिसांचा गणवेश घालून येत आणि ग्राहकांना कारवाईची भीती दाखवत. बदनामी होऊ नये, यासाठी संबंधित प्रकरण दाबण्‍यासाठी पैसे देत. अशा प्रकारे या त्रिकुटाने अनेकांना गंडा घातला. त्‍यांच्‍याकडे महाराष्‍ट्र पोलिसांचे खोटे ओळखपत्रसुद्धा होते. या बाबत खब-याकडून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे पोलिसांनी जयताळा येथील शिवप्रिया टॉवर्सच्या ए-विंगमधील चौथ्या मजल्यावर सापळा रचून त्‍यांना अटक केली.