आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांतील ‘हाॅट वीक’, तापमानाने वर्षांमधील विक्रम निघाले मोडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - फाल्गुन सुरू होताच सूर्य आग ओकू लागल्याने तापमापकातील पारा वेगाने वर सरकू लागला आहे. सकाळी आठनंतरच उन्हाचे चटके बसत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील ४० अंशांवर असलेले तापमान आता ४५ अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे १५ ते २१ एप्रिलदरम्यानच्या सरासरी ४४.६ अंश तापमानाने मागील सहा वर्षांमधील विक्रम मोडीत काढले असून, हा आठवडा सर्वाधिक हाॅट म्हणून गणला जात आहे. यापूर्वी तापमापकातील पारा कधीही ४५ अंशांपर्यंत पोहोचला नव्हता. यंदा मात्र प्रत्येक दिवशी ४५ अंश किंवा त्याच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. यावरून यंदाचा उन्हाळा त्रासदायक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
जलविज्ञान प्रकल्पाच्या नोंदीनुसार १५ ते २१ एप्रिल या सात दिवसांचे तापमान दरदिवशी ४५ अंशांच्या आसपास होते. विशेष म्हणजे याच आठवड्यात बुधवारी (दि. २०) तापमान ४५.३ अंश होते. बुधवारी असलेले तापमान यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. मागील काही वर्षांतील याच आठवड्यातील तापमानाच्या नोंदी पाहिल्या असता त्या ४० ते ४२ अंशापर्यंतच आहे. सध्या सकाळी १० वाजताच उन्हाचे चटके लागतात. ११ वाजता इतके प्रखर ऊन असते की, त्या चटक्यांमुळे शरीराची लाहीलाही होते. दुपारी १२ ते सांयकाळी वाजेपर्यंत तर रस्त्याने चालणे किंवा वाहन घेऊन जाणे म्हणजे खरोखरंच 'अग्निपरीक्षा' असते. दुपारी वाहन घेऊन रस्त्याने जाताना असे वाटते की, रस्त्याच्या दुतर्फा आगीचे लोळ असावेत आपण त्यामधून जात आहोत, असा अनुभव सद्य:स्थितीत शहरात दुपारच्या वेळी फिरणाऱ्या वाहनचालकांना दरदिवशी येत आहे. विदर्भात दरवर्षीच मुंबई, पुणेच्या तुलनेत तापमान प्रचंड राहते. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या दाहकतेची सवय झालेली आहे. मात्र, या वर्षी एप्रिल महिन्यातच मे महिन्यापेक्षाही जास्त उनाचे चटके घरांतील कूलर्स बाहेर निघाले. मात्र, सध्या तापमानाने पंचेचाळिशी गाठली आहे. अशावेळी घरातील कूलरसुद्धा थंडावा देण्यासाठी कमी पडत आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळापासूनच कुलर सुरू होतात. मात्र, या तापमानात कूलरसुद्धा थंडावा देण्यासाठी फारसे प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे.

अशी आहेत उष्माघाताची लक्षणे
वाढलेले तापमान वाढलेल्या आर्द्रतामुळे उष्माघात होतो.
सामान्य लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक लागणे, चक्कर येणे, निरु त्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानिसक बेचैन अस्वस्थता, बेशुद्ध होणे.
तीव्र लक्षणे : उष्माघाताची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा रुक्ष होते, सुरकुतलेली दिसते. जीभ आत ओढली जाते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. उलटी होते. व्यक्ती बेशुद्ध पडते.

Áघराबाहेर पडताना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका.
Áपाण्याची बाटली सतत जवळ ठेवा. सतत पाणी पित राहा.
Á उन्हातील गरम हवेपासून बचाव करण्यासाठी चेहरा सुती कपड्याने झाका.
Áउन्हातून घरी आल्यानंतर लगेच पाणी घेऊ नका.
Á शक्यतो उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाणे टाळा.
Áएसीतून थेट उन्हात जाऊ नका. सामान्य वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर बाहेर पडा.
Á शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.
Áबाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा.
Áउन्हाळ्यात भरपेट जेवण करु नका. भूकेपेक्षा थोडं कमी जेवण करा.
Á उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नका.
Á दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा.


जलविज्ञान प्रकल्पातील वर्षांतील तापमानाच्या नाेंदी
दिनांक२०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६
१५ एप्रिल ४०.५ ४१.५ ४१.७ ४० ३२.७ ४४.९
१६ एप्रिल ४१.५ ४२ ४२ ४१.८ ३५ ४४.७
१७ एप्रिल ४२ ४१.२ ४०.५ ४२.३ ३७.५ ४४
१८ एप्रिल ४०.५ ४३ ४०.९ ३९.२ ४०.७ ४४.१
१९ एप्रिल ४१.२ ४१ ३९.५ ४०.४ ४३ ४४.२
२० एप्रिल ३९.५ ४१.८ ३५.९ ४०.२ ४२.५ ४५.३
२१ एप्रिल ३८.५ ४०.५ ३७.६ ४०.१ ४३.६ ४५