आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर वाढल्यामुळे आता तुरीच्या डाळीचीही चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील काही दिवसांपासून तूर डाळीचे वाढलेले भाव लक्षात घेता चोरट्यांनीसुद्धा घरात चोरी करतेवेळी तूर डाळ लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रेखा कॉलनीमधील एका घरात प्रवेश करून चोरट्यांनी ३५ किलो तुरीची डाळ चोरून नेली. ही घटना नोव्हेंबरला घडली असून, याप्रकरणी मंगळवार, नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अनिलराव आकाशरामजी महल्ले ५५ यांचे रेखा कॉलनीमध्ये घर आहे. नोव्हेंबरला पहाटे ते वाजताच्या सुमारास महल्ले यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी ३५ किलो तुरीची डाळ चोरून नेली. चोरट्यांचा वावर या भागात वाढला असल्याचे लक्षात आल्यामुळे महल्ले यांनी दुसऱ्या दिवशी त्याच वेळी चोरट्यांवर पाळत ठेवली होती. नोव्हेंबरलासुद्धा त्याच वेळी चोरटे महल्ले यांच्या घराजवळ आले. त्या वेळी महल्ले यांनी आरडाओरड केला असता चोरट्यांनी पळ काढला. मात्र, तूर डाळीचे वाढलेले भाव लक्षात घेता त्यांनी सोमवारी पहाटे ३५ किलो तूर डाळ चोरली आहे. या डाळीची किंमत सहा हजार रुपये आहे. मागील एक महिन्यापासून तूर डाळीच्या भावात विक्रमी वाढ झालेली आहे. कधी नव्हे ती तूर डाळ प्रती किलो २०० रुपये किलो झाली होती. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली तूर डाळ चोरट्यांनी चोरली आहे. घरातून तूर डाळ चोरी त्या प्रकरणाची पोलिसांत तक्रार ही अलीकडच्या काळातील शहरातील पहिलीच घटना आहे. महल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तूर डाळीच्या वाढलेल्या दरांवर सोशल मीडियांवर विनोदी किस्से यायला लागले होते.
बातम्या आणखी आहेत...