आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांना मोहिनी घालणारे विदर्भाचे नंदनवन, 10 फोटोंमध्‍ये पाहा सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( चिखलदरा येथील गाविलगड.)
अमरावती - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्‍या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरामध्‍ये नुकताच चिखलदरा पर्यटन महोत्सव उत्‍साहात साजरा झाला. विदर्भातील पर्यटकांनी या महोत्‍सवातील कार्यक्रमांचा आनंद घेतला. या संग्रहातील फोटोंमधून पाहूया चिखलदराचे सौंदर्य. येथे दिसू शकतात वाघ..

येथे दिसू शकतात वाघ..
- चिखलदरामध्‍ये नेहमीसाठी थंड आणि आरोग्‍यदायी हवामान असते.
- पावसाळ्यात दाट धुके आणि हिरवळीनं सजलेल्‍या पर्वतरांगा पर्यटकांना मोहिनी घालतात.
- सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.
- येथील मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केली आहे.
- चिखलदराहून सेमाडोहला जाणा-या रस्त्यावर वाघ दिसू शकतात.
- मोर, रानकोंबडा व अस्वले येथे मोठ्या प्रमाणात आढळतात.
- येथील जंगल शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे.
हे आहेत प्रेक्षणीय स्थळे....
1. पंचबोल (इको पॉईंट)
2. देवी पॉईंट
3. नर्सरी गार्डन
4. प्रॉस्पेट पॉईंट
5. बेलाव्हिस्टा पॉईंट
6. बेलेन्टाईन पॉईंट
7. भीमकुंड‎
8. मंकी पॉईंट
9. लॉग पॉईंट
10.लेन पॉईंट
11. वैराट पॉईंट
12. हरिकेन पॉईंट
( ब्रिटिश अधिका-यांनी चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे दिलेली आहेत.)

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, चिखलदरामधील निसर्गाचे फोटो..