आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील हिंदू सर्वात धर्मनिरपेक्ष; माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भारतावर अनेक वेळा आक्रमण झाले. यात अनेक धर्मांचे आणि पंथाचे लोक या देशात आले. सर्वांना समावून घेण्याचे काम या देशातील हिंदूंनी केले आहे. देशातील हिंदूच हेच सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पद्मभूषण स्व. मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. 

डॉ. कुरेशी म्हणाले, आज जेवढे प्रगत देश आहेत, त्यांनी संविधानात दिलेल्या तरतुदीचे अनुकरण करण्यास बराच वेळ लावला. मात्र भारतात 1950 सालीच सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क दिला गेला. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी महिलांना दिली गेली.  अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्येही सर्वोच्च पदांवर महिलांना अद्याप प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. जातीय दंगे असो किंवा दोन गटांत होणारे वाद या देशाला नवे नाहीत. मात्र, ते तात्पुरते असून कुठल्याही संकटात देश एकसंघपणे उभा राहतो हेच आपले वैशिष्ट्य आहे. देशात विविधता मोठया प्रमाणात आहे. त्याचवेळी देशातील एकता टिकून असल्याने देशाचे अस्तित्व कायम असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल माहिती दिली. कुलगुरू डॉ. सि. प. काणे, प्र कुलगुरू प्रमोद येवले यावेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...