आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - रूक्‍मिणीच्‍या माहेरी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, वाचा ऐतिहासिक कौंडिण्‍यपूरचे महत्‍त्‍व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिराचा परिसभर भाविकांच्‍या उपस्‍थितीने असा फुलला होता. - Divya Marathi
मंदिराचा परिसभर भाविकांच्‍या उपस्‍थितीने असा फुलला होता.
माता रूक्‍मिणीचे माहेर असलेले अमरावती जिल्‍ह्यातील कौंडिण्‍यपूर येथे अधिकमास, आषाढी एकादशीनिमित्‍त हजारो भाविकांची गर्दी होत आहे. अधिक महिन्‍यामध्‍ये येथील वर्धा नदीमध्‍ये स्‍नान करण्‍याला भाविक महत्‍त्‍व देतात. विदर्भाची पंढरी असलेल्‍या कौंडिण्‍यपूरला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्‍याची माहिती व्‍यवस्‍थापनाने दिली आहे.
चार तास ट्राफिक जॅम
रविवार, अधिक मास आणि आषाढी एकादशीच्‍या निमित्‍ताने महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्‍याने मंदिराकडे जाणा-या रस्‍त्यावर तब्‍बल चार तास वाहतूकीची कोंडी होती.
विविध नावांनी इतिहासात आेळख
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ असलेले कौंडिण्‍यपूर हे अमरावतीच्‍या पूर्वेस सुमारे 64 किमी अंतरावर वर्धा नदीच्‍या तिरावर वसलेले तिर्थक्षेत्र आहे. प्राचीन साहित्यामध्‍ये कुंडिनपूर, कुंडिनी, कुंडलपूर, कुंडीन, विदर्भ, विदर्भा अशा विविध नावांनी कौंडिण्‍यपूरची ओळख आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीकथेशी या स्‍थळाचा संबंध जोडलेला आहे.

पंढरीचा पांडूरंगाविषयी आहे अाख्‍यायिका

दत्त, लक्ष्मीनारायण, पंचमुखी महादेव, तसेच विठ्ठल-रुखुमाईची येथे मंदिरे आहेत. पंढरपूरचा विठोबा येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला अवतरतो अशी आख्यायिका आहे. येथील नदीकाठी १९६२-६३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यामध्‍ये इ. स. पू. तिसऱ्‍या-चौथ्या शतकांतील अवशेष उपलब्ध झाले आहेत.

पुढील स्‍लाईडवर पाहा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे फोटो..