आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home State Minister On Streets Were To Improve The Transport

शहर वाहतूक सुधारण्यासाठी गृहराज्यमंत्री उतरले रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील हे स्वत: शुक्रवारी (दि. ८) थेट रस्त्यावर उतरले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काही निवडक ठिकाणांची पाहणी करून आठ दिवसांत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या वेळी त्यांच्यासोबत पोलिस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी हजर होते.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी यापूर्वीच पोलिस महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळेच पोलिसांच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांपासून वाहतूक सुधारण्यासाठी काय बदल करता येईल यासंदर्भात काम सुरू केले होते. दरम्यान, शहरात जड वाहनांच्या "नो एंट्री'सोबतच कोणत्या मार्गावरून वाहतूक बंद करावी, ज्यामुळे वाहतूक समस्या निकाली काढता येईल अशा काही उपाययोजना करण्याचे पोलिसांच्या विचाराधीन होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. ८) गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यासंदर्भात आढावा घेत होते. त्यांनी स्वत: पोलिस आयुक्त अन्य पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन शहरातील काही निवडक ठिकाणांची पाहणी केली. शहरातील राजापेठ ते गांधी चौक मार्गावर एका ट्रकने दोन महिन्यांपूर्वी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले होते. या अपघातानंतर पुन्हा एकदा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर गृहराज्यमंत्री पाटील यांनी वाहतुकीचा आढावा घेऊन पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना वाहतूक सुधारणा करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी त्या वेळी पासून वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी काही बदल करण्याचे ठरवले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गृहराज्यमंत्री पोलिस अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात आढावा घेत होते. त्या वेळी त्यांनी स्वत: शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. वाहतूक सुधारण्यासाठी पोलिसांच्या विचाराधीन असलेले वाहतुकीतील बदल याप्रमाणे असतील. शहरात विविध भागातून प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मुख्य ११ ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात येईल. यामध्ये अमरावती ते बडनेरा जुन्या मार्गांवरून जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. बडनेराकडून एमआयडीसीकडे येणाऱ्या वाहनांना एमआयडीसी कार्यालयापर्यंत येता येईल, मात्र त्यापुढे शहरात येण्यास प्रतिबंध राहील. बडनेराकडून सातुर्णा एमआयडीसीकडे येणाऱ्या जड वाहनांना रॉयल एफिल्ड शोरूमपासून डावे वळण घेऊन केवळ एमआयडीसीकडे जाता येईल. चांदूर रेल्वे, मार्डी कुऱ्हा मार्गाने बियाणी चौक चपराशीपुरा येथून उजवे वळण घेऊन बियाणी चौक, वेलकम पॉइंट, गौरी इन मार्गे नवीन एक्स्प्रेस हायवेने रिंग रोड मार्गे जावे.

पो. ठाणे अपघात गंभीर किरकोळ एकूण

राजापेठ३८ ५२ ३०१ ३९१
कोतवाली २८ २८ १८६ २४२
गाडगेनगर ६६ ७९ ३०५ ४५०
वलगाव ४० ८३ ९८ २२१
नागपुरी गेट ४१ ५४
खोलापुरी गेट ३२ ३९
बडनेरा ४८ ६२ १२६ २३६
फ्रेजरपुरा ४६ ४१ १७७ २६४
भातकुली १५ २७
नांदगावपेठ ७५ ६२ १३६ २७३
एकूण३५६ ४२४ १४१७ २१९७

पाच वर्षांत २१९७ अपघात, ३५६ मृत्यू
अमरावती आयुक्तालयाच्या हद्दीत २०११ ते २०१५ पर्यंत २१९७ अपघात घडले असून, त्यात ३५६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी वाहतूक शाखेने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.

आठ दिवसांमध्ये अंमलबजावणी होईल
^जडवाहतूकशहराबाहेरून वळती केल्यास वाहतुकीला अडथळा होणार नाही.त्यामुळे अकरा ठिकाणांवरून शहरात जड वाहनांना प्रवेशबंदीचा निर्णय विचाराधीन आहे. तसेच शहरात काही ठिकाणी एक दिशा मार्ग करण्यात येईल . आगामी आठ दिवसांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस मनपाला दिले आहेत. डाॅ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री.