आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Murdered By Father Over Inter Caste Marriage

मुलीने केले पळून जावून आंतरजातीय लग्‍न; बापाने दगडाने ठेचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजली भाले. - Divya Marathi
अंजली भाले.
अमरावती - जिल्‍ह्यातील सार्सी या गावातील एका तरुणीने गावातीलच एका तरुणासोबत पळून जाऊन आंतरजातीय लग्‍न केले. यामुळे चिडलेल्‍या मुलीच्‍या वडिलांनी मुलीच्‍या डोक्‍यात दगड घालून तिची हत्‍त्‍या केली. त्‍यामुळे गावात खळबळ उडाली आहे. अंजली संजय भाले (20) असे मृत तरुणीचे नाव आहे.
कसे जुळले प्रेमप्रकरण
अंजली हिचे काही महिन्‍यांपूर्वी गावातीलच अजय चव्‍हाण या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. अजयचे अंजलीच्‍या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्‍यामुळे त्‍याला अंजलीचे आई-वडीलही ओळखत असत. त्‍यामुळे या दोघांवर कुणाचा संशय आला नाही. परंतु, 15 दिवसांपूर्वी हे दोघे घरून पळून गेले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, वडिलांना कसे माहिती पडले अंजली कुठे आहे ते... नेमकी का केली पोटच्‍या पोरीची हत्‍त्‍या...