आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातून पळालेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -   वसतिगृहातून पळून गेलेल्या सोळा वर्षे वयाच्या मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण नागपुरात उघड झाले अाहे. पोलिसांनी याप्रकरणी चाैघांना अटक केली.  फिरोज अहमद जमील अहमद, (४०), स्वप्निल जवादे (२७), मयूर बारसागडे (२३) आणि अतुल ऊर्फ नरेश जनबंधू (२२) अशी अाराेपींची नावे अाहेत.
 
नववीत शिकणारी पीडित मुलगी सदर परिसरातील एका वसतिगृहात राहत होती. तेथील वातावरण पसंत न आल्याने तिने गुरुवारी अन्य तीन मुलींसह वसतिगृहातून पळ काढला. त्या दिवशी चौघीही शहरभर फिरल्यावर रात्री एका दुकानासमोर झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सोबतच्या मुली तिला सोडून निघून गेल्या. पीडित मुलगी सीताबर्डी परिसरात फिरत असताना एका व्यक्तीने तिला जेवण देण्याचे आमिष दाखवून फ्लॅटवर नेले. तेथे चार जणांनी बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे तिला सीताबर्डीत सोडून दिले हाेते. दरम्यान, पीडित युवतीने रविवारी सकाळी सीताबर्डी पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली होती. 
बातम्या आणखी आहेत...