आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेनोडा-म्हसला-रहाटगावपर्यंत विस्तारणार "सर्वांसाठी घरे'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बेनोडा-म्हसला-रहाटगावपर्यंतसर्वांसाठी घरे विस्तारणार आहे. महापालिका कर्मचारी तसेच नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी तीन क्षेत्रातील भूखंडांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयाला मान्यता देण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री अावास योजने अंतर्गत महापालिका कर्मचारी नागरिकांना घरे उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून घरांबाबत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरासाठी हजार ५० घरांना मंजूरी देण्यात आली आहे. शिवाय योजनेकरीता १७५.५० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला.

या तीन क्षेत्रात महापालिका कर्मचारी लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेेल्या नागरिकांना घरे बांधून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे बांधकाम राहणार आहे. केंद्र सरकार प्रत्येकी १.५० लाख तर राज्य सरकार लाख रुपयांचे अनुदान घर बांधकामाकरिता मिळणार आहे. महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून याबाबतचा विषय शनिवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

सर्वांना घरकुल देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती. लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देताना केंद्र राज्य शासनाला यामध्ये मदत करावी लागणार आहे. त्यासाठी राज्याकडून केंद्र सरकारसोबत १७ फेब्रुवारीला योजनेबाबत सामंजस्य करार केला आहे. सर्वांसाठी घरकुल योजनेसाठी अमरावती महापालिकेला ५३८ कोटी रुपये प्राप्त होणार आहे.

असे आहेत भूखंड मौजासर्व्हे. भूखंड
म्हसला२१ भाग/२२ १ते ११,१ ते ९, ते १६,१२ते१५,३३ ते ३९, क्षेत्र ९७१४२ चौ.फु.
बेनोडा ११ भाग ४४७ ते४५१,३६६ ते ३७१, एकूण क्षेत्र २९७०४ चौ. फु.
रहाटगाव ११७ भाग ०.७० हेक्टर आर
बातम्या आणखी आहेत...