आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसह सासुला कारावास, माहेरहून पैसे आणण्‍यासाठी विवाहितेचा केला छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा दगादा लावून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासूला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (क्रमांक ३) यांच्या न्यायालयाने शनिवारी (दि. १५)एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विनोद पंजाबराव इंगळे (३२) आणि इंद्रकला पंजाबराव इंगळे ( ५५ दोघेही रा. तोंडगाव, ता. चांदूर बाजार) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
 
गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीचा विवाह चांदूर बाजार तालुक्यात राहणाऱ्या विनोद इंगळेसोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच विनोदने त्याच्या पत्नीवर सौंदर्याच्या मुद्दयावरून टिप्पणी करून ऑटो घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी केली होती. दरम्यान याच कारणावरून विवाहितेने पती सासुविरुद्ध १२ एप्रिल २०१२ ला गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात दोष सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने आराेपींना उपरोक्त शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून अॅड. शर्मा यांनी युक्तीवाद केला.
बातम्या आणखी आहेत...