आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व हिंदू परिषद गोरक्षकांना देणार ओळखपत्र; अजय निलदावार याची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बोगस गोरक्षकांचा हैदोस टाळण्यासाठी राज्य सरकारने विश्व हिंदू परिषदेला अधिकृत गोरक्षकांची यादी मागितली आहे. राज्य शासनाशी समन्वयातूनच अधिकृत गोरक्षकांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे संयोजक व प्रदेश मंत्री अजय निलदावार यांनी दिली.

ते म्हणाले की, विहिंप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी तीनदा चर्चा केली. शासनाने अधिकृत गोरक्षकांची यादी मागवली आहे. गोरक्षकांनी विदर्भात २५ हजार गोवंश वाचवून त्यांची व्यवस्था केली. अनेक गोरक्षकांवर राज्यात अनावश्यक गुन्हे दाखल झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...